Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायत क्षेत्रातील व्याधिग्रस्त व्यक्तींचा झाला सर्व्हे

 सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायत क्षेत्रातील व्याधिग्रस्त व्यक्तींचा झाला सर्व्हे 

1 हजार 936 व्याधिग्रस्त आढळले योग्य वेळी उपचार सुरु

प्रतीक मिसाळ- सातारा



सातारा जिल्ह्यातील 1 हजार 497 ग्रामपंचायतींमध्ये आशा , अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत दररोज केल्या जाणाऱ्या कोमॉर्बिड सर्व्हेक्षणांतर्गत कोविड -19 लक्षणे सदृष्य लक्षणे असलेली 1 हजार 936 रुग्ण आढळून आले आहेत , अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे . सातारा जिल्ह्यात आशा व अंगणवाडी ताई सेविका यांच्या माध्यमातून दररोज 25 ते 40 व्याधीग्रस्त नागरिकांचा सर्वे केला जात असून यामध्ये विविध लक्षण असणारे नागरिक व 94 पेक्षा कमी ऑक्सीजन असणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत तात्काळ कोविड टेस्ट केली जात आहे , मागील आठवड्यात झालेल्या सर्वेनुसार सातारा तालुक्यातील 195 ग्रामपंचायतींमधील 7 हजार 38 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 299 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . कोरेगाव तालुक्यातील 142 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 294 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 211 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . खटाव तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 911 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 394 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . माण तालुक्यातील 95 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 118 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 300 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींमधील 5 हजार 860 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 132 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . खंडाळा तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींमधील 150 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 17 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींमधील 3 हजार 72 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 54 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . जावली तालुक्यातील 125 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 193 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 100 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . महाबळेश्वर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींमधील 905 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 19 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 933 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 323 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . पाटण तालुक्यातील 234 ग्रामपंचायतींमधील 393 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले . त्यापैकी 87 नागरिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले . या सर्व्हेमुळे लवकर निदान झाले , त्या सर्वांवर योग्य वेळी उपचार सुरु झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies