आता मिनी काश्मीर महाबळेश्वर येथेही मिळणार कश्मीरी केशर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, May 13, 2021

आता मिनी काश्मीर महाबळेश्वर येथेही मिळणार कश्मीरी केशर

आता मिनी काश्मीर महाबळेश्वर येथेही मिळणार कश्मीरी केशर

मोठ्या प्रमाणावर होणार लागवड

प्रतीक मिसाळ-महाबळेश्वरमहाबळेश्वर म्हटले की आपल्याला आठवतात ते काश्मिरी थंडी, उंचच उंच डोंगर , पावसाळा , आणि तिथल्या स्ट्रॉबेरी !नी भरपूर पर्यटनाची मज्जा महाबळेश्वरची ओळखच ती आहे . पण इथून पुढे महाबळेश्वर अजून एका गोष्टीसाठी ओळखले जाणारे आहे आणि ते म्हणजे केसर . आपल्याला केसर म्हटलं की डोळ्यासमोर काश्मीर उभं राहतं . परंतु आता पहिल्यांदाच केसर हे महाराष्ट्रात पिकवल गेलं आहे . प्रायोगिक तत्वावर केलेली ही लागवड यशस्वी झाली आहे . महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्मीर येथील किरतवाड येथून कंद आणले होते . केशराचे हे कंद चोवीसशे रुपये किलोप्रमाणे खरेदी करण्यात आले होते . एक किलोमध्ये पस्तीस ते चाळीस कंद येतात . सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंदांची लागवड करण्यात आली होती . केसर लागवडीसाठी तापमान 10 डीग्री लागते . जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून 2000 ते 2500 मिटर उंच असावी लागते . साधारणता ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात लागवड केली जाते . डिसेंबर ते जानेवारी दरम्यान फुले येतात आणि जानेवारी महिन्यात फुले खुडून वाळवन्यात येऊन त्यापासून केसर मिळवले जाते .केसरच्या शेतीसाठी महाबळेश्वर मधील गणेश जांभळे आणि मेटगुताड येथील दीपक व अशोक बावडेकर या शेतकऱ्यांची निवड केली गेली होती . त्यांच्या शेतात लावलेल्या कंदाला काही दिवसातच कोंब फुटले म्हणून शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांना खुप मोठा आनंद झाला . अजून काही दिवसात कळ्या आल्या आणि त्यांनी त्या कळ्या खुडून त्यातील ' किंजल्क ' म्हणजे केसर काढून दुधात टाकले तेव्हा ते 100 % केसर असल्याची खात्री पटली .केशरच्या यशस्वी प्रयोगानंतर आता काश्मिरी सफरचंद च्या लागवडीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment