जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आरोग्य यंत्रणेला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, May 9, 2021

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आरोग्य यंत्रणेला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट

 जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने आरोग्य यंत्रणेला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट

उद्योजक आनंद पेडणेकर यांनी निभावले सामाजिक दायित्व

ओकार रेळेकर-चिपळूणसंपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रिय जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स पेढीने चिपळूण तालुका आरोग्य विभागाला पाच ऑक्सिजन सिलेंडर भेट स्वरूपात दिले आहेत.

  जगन्नाथ गगंगाराम पेडणेकर ज्वेलर्स चे मुख्य संचालक तथा प्रतिष्ठित उद्योगपती आनंद जगन्नाथ पेडणेकर यांचे आपद्ग्रस्त काळात शासनाला सदैव मदतकार्य सुरू असते कोरोना महाभयंकर संकट काळात सध्या कोरोना रुग्णांना प्राणवायू ची नितांत आवश्यकता आहे ,ही बाब लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता आनंद पेडणेकर यांनी चिपळूण तालुका आरोग्य विभागास पाच ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क मोफत भेट दिले आहेत,

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स  चिपळूण पेढीचे व्यवस्थापक प्रशांत शिरवडेकर ,बीपीन चव्हाण,विनती सावंत यांनी सदर ऑक्सिजन सिलेंडर चिपळूण तालुका आरोग्य विभागात तालुका वैद्यकीय अधिकारी जोती यादव यांच्या ताब्यात दिले.


No comments:

Post a Comment