पर्णकुटी तर्फे बुधवार पेठेतील गरजू महिला तसेच बालकांना मदत
किशोर उकरंडे -पुणे
"जेव्हा सारख्याच विचारांची ध्येयाची माणसे एकत्र येतात तेव्हाच मोठे यश संपादित होते."
अशीच प्रेरणा घेत पर्णकुटी संस्था(NGO) पुणे शहरात गरजू नागरिकाना फुल ना फुलाची पाकळी याप्रमाणे मदत करत आहे
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात महिलांना व त्यांच्या मुलांना happiness kit वाटप करून समाजात कोरोना विषाणूच्या संकटात देखील कोण तरी आपलं माणूस असल्याचा जणू भास करून देत आहे
डाळ ,तेल ,बटाटे असल्या जीवनावश्यक वस्तू बरोबर मास्क सॅनिटीझर देखील देण्यात आले
समाज ज्या देहविक्री करणाऱ्या महिलांना विकृत नजरेने पाहत असतो मात्र त्या महिला कोणत्या आत्ता या लोकडोवन च्या काळात आपला उदरनिर्वाह कसे करत असतील मात्र पर्णकुटी ने यांना मदत करून एक आशेचा किरण जागवत त्यांनाही अपुलकी ची जाणीव करत त्यांच्या लहान मुलांना खाऊ वाटप केले