Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार ? आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत

 खा.उदयनराजेंच्या घोषणेची अंमलबजावणी पालिका कधी करणार ? आ . शिवेंद्रसिंहराजे ; फेरीवाल्यांना कधी मिळणार एक हजाराची मदत

प्रतीक मिसाळ- सातारा सातारा- लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा देण्यासाठी सातारा नगर पालिका फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देणार असल्याची घोषणा खासदार उदयनराजेंनी केली होती . या घोषणेला आता दीड महिना उलटला असून उपासमारीने हैराण झालेले फेरीवाले या एक हजार रुपयांच्या मदतीची आतुरतेने वाट बघत आहेत . खा . उदयनराजेंच्या घोषणेची सातारा पालिका अंमलबजावणी कधी करणार ? का ही घोषणाही हवेत विरणार आहे , असा सवाल आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे . कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले . चालू घडीला फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे . लॉकडाऊनमध्ये फेरीवाल्यांना दिलासा मिळावा म्हणून खा . उदयनराजेंनी सातारा पालिकेकडून प्रत्येक फेरीवाल्याला एक हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मोठी घोषणा केली होती . खा . उदयनराजेंच्या घोषणेचे जोरदार स्वागतही झाले होते . गेले महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले आहे . त्यांच्यासह त्यांच्या बायकापोरांची , वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरु आहे . मात्र अद्यापही खा . उदयनाराजेंनी जाहीर केलेली एक हजार रुपयांची मदत पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही . फेरीवाले डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट बघत बसेले आहेत . घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल झालेली नाही . उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्याना अजून का दिले गेले नाहीत ? बहुदा मर्जीतल्या ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमिशन लाटायचे असल्याने सातारा पालिका फेरीवाल्यांचे पैसे देऊ शकत नसावी . फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने खा . उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे पालिकेकडून फेरीवाल्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे , असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे . 


अभिनव योजना जाहीर करा 


खा . उदयनराजेंनी घोषणा करूनही फेरीवाल्यांना पालिकेकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही याचे आश्चर्य आहे . आत्ता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर , लॉकडाऊन संपून पुन्हा कधी हॉकर्सचा व्यवसाय सुरु होईल आणि तेव्हा सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील , तेव्हा त्यामध्ये एक हजार रुपये कन्सेशन देऊ , अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी , असा उपरोधिक टोला आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies