जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनची नियमावली जाहीर ; फक्त 'हे' राहणार सुरु... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, May 14, 2021

जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनची नियमावली जाहीर ; फक्त 'हे' राहणार सुरु...

 जिल्हा प्रशासनाकडून लॉकडाऊनची नियमावली जाहीर ; फक्त 'हे' राहणार सुरु...

भिमराव कांबळे -कोल्हापुर 

 जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढलेले मृत्यूचे प्रमाण यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या  पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार १५ मेच्या मध्यरात्रीपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याची नियमावली जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केली. या कालावधीत अत्यावश्यक बाबी वगळता इतर सर्व उद्योग, व्यापारी आस्थापना, सेवा पुरवणारे घटक बंद ठेवण्यात येणार आहेत. 

हे राहणार सुरु - 

१) जीवनावश्यक वस्तू - फक्त दूध, भाजीपाला व गॅस - घरपोच विक्री (सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते सायं. ७) दूध संकलन, वाहतूक व वितरण व्यवस्था... 

२) सर्व वैद्यकीय सुविधा, औषध दुकाने व वैद्यकीय सुविधेसाठी आवश्यक सर्व उत्पादन, विक्री, वाहतूक व वितरण व्यवस्था. तसेच सर्व प्रकारचे औषध निर्मिती करणारे उद्योग व त्यासाठी कच्चामाल पुरवणारे उद्योग व त्यांची वितरण संबंधी नियोजन करणारी कार्यालये... 

३) ऑक्सीजन उत्पादन व पुरवठा करणारे उद्योग व त्यांना कच्चामाल पुरवठा करणारे उद्योग तसेच त्यांची वितरण व्यवस्था...

४) शेतीशी निगडीत कामे व मान्सून पूर्व कामे... 

५) इंधन व पेट्रोलियम पदार्थ विक्री, वाहतूक व वितरण व्यवस्था. (फक्त अत्यावश्यक सेवेमधील वाहनांसाठी)

६) कायदा व सुव्यवस्था आणि अत्यावश्यक सेवेसाठी लागणारे सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, आरोग्य सेवेशी निगडीत सर्व आस्थापना व कार्यालये शासनाकडील निर्देशानुसार १५% उपस्थितीसह व न्यायालयीन कामकाज... 

७) एटीएम, पोस्ट कार्यालये... 

८) प्रसारमाध्यमे, वृत्तपत्र वितरण... ९) इंटरनेट यंत्रणा, दूरध्वनी, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या आस्थापना व कार्यालये... 

१०) सर्व प्रकारची माल वाहतूक... 

    

तसेच महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्याच्यावेळी ४८ तास अगोदर देण्यात आलेला 'आरटीपीसीआर'चा निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक असणार आहे.

No comments:

Post a Comment