Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बिगबॉस फेम सातारकर,कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेंचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपॉझिट जप्त


पंढरपूर पोटनिवडणूकीत 137 मते

बिगबॉस फेम सातारकर,कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेंचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपॉझिट जप्त

प्रतीक मिसाळ -सातारामहाराष्ट्रात कोठेही पोटनिवडणुक लागू द्या बिचुकले यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटलेच म्हणून समजा ,मग पुढे कितीही मोठा उमेदवार असो.पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांना १३७ मते मिळाली आहेत . पंढरपूर पोटनिवडणूकीत त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असून आतापर्यंत अभिजीत बिचकुलेचे सहावेळा डिपॉझिट जप्त झाले आहे . तरीही त्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही . अभिजित बिचुकले हे 2004 साली सातारा पालिकेची निवडणुक यश मिळाले नाही . 2014 मध्ये अभिजित बिचुकले आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात 392 मते मिळाली . 2014 खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात सातारा लोकसभेला 3677 मते मिळाली . या दोन्ही ठिकाणी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते . 2019 सातारा जावळी विधानसभा व सातारा लोकसभेच्या दोन्ही निवडणूका लढल्या . सातारा विधानसभेच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात त्यांना 759 मते मिळाली . तर लोकसभेच्या निवडणूकीत 2412 मते मिळाली . येथेही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले . 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शडू ठोकला होता . काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली . 2021 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्जही भरला . या निवडणुकीत त्यांना 137 मते मिळाली . त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे . पलुस - कडेगांव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कै . पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित कदम यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता . ऐनवेळी अर्ज मागे घेतला.पण एवढे सर्व होऊनही पुढील येणाऱ्या निवडणुकीतून माघार घेतील ते बिचुकले कुठे.पुढील निवडणुकीसाठी ते नेहमीच सज्ज राहतील.वेळ आल्यावर आपण पाहणारच आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies