पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुरबाडला पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशिन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुरबाडला पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशिन

 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुरबाडला पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशिन

सुभाष पवार यांच्या हस्ते वाटप

सुधाकर वाघ-मुरबाड राज्याचे नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून मुरबाड तालुक्यातील रुग्णांना पाच ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ऑक्सिजन मशिन सुपूर्द करण्यात आल्या.

  कोविड सेंटरमधून उपचार घेऊन आलेल्या रुग्णांना काही वेळा ऑक्सिजनची गरज भासते. त्यावेळी नातेवाईकांची धावपळ उडत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार व शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे यांनी मुरबाड तालुक्याला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स देण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी ​ ऑक्सिजन बॅंकेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्याला पाच मशीन उपलब्ध करण्यात आल्या. कक्षाचे प्रमुखांनी तातडीने मशीन मुरबाडपर्यंत पोचविल्या. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे व शिवसेना शहरप्रमुख रामभाऊ दुधाळे यांच्याकडे पाच मशीन सुपूर्द करण्यात आल्या. मुरबाड तालुका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्या रुग्णांना वापरासाठी दिल्या जाणार आहेत.

No comments:

Post a Comment