ट्रकच्या ब्रेकमध्ये बॉटल अडकल्याने अपघात होऊन एकजण ठार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

ट्रकच्या ब्रेकमध्ये बॉटल अडकल्याने अपघात होऊन एकजण ठार

 ट्रकच्या ब्रेकमध्ये बॉटल अडकल्याने अपघात होऊन एकजण ठार

 दत्तात्रेय शेडगे-खोपोली


मुबंई पुणे जुन्या महामार्गाने लोणावळा हुन खोपोली कडे ट्रक जात असताना त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक ने दस्तूरी येथील अंडा पॉईंट जवळील कठड्याला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मधील चालक जागीच ठार झाला 

          पुण्या हुन मुबई कडे माल घेऊन ट्रक नो एंट्री मार्गे खोपोली कडे जात असताना तो दस्तूरी येथील अवघड वळणावर अंडा पॉईंट जवळ आला असता ट्रकच्या ब्रेक मध्ये पाण्याची बाटली अडकल्याने ट्रक चा ब्रेक न लागल्याने त्याने समोरील कठड्याला जोरदार धडक दिली यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, 

   या घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, अपघात ग्रस्त टीम, देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक मधील अडकेल्या चालकाला बाहेर काढण्यात मदत केली

No comments:

Post a Comment