संगीता फणसे कालवश
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
जव्हार सारख्या दुर्गम भागात अडल्यानडल्यांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी गेली अनेक वर्षे जोपासले होते. त्यांचे तेथील घर म्हणजे अनेकांना हक्काचा आधार होता. एरवी तर त्या कोणाच्याही मदतीला-अडचणीला धावून जात असतच, पण अगदी रात्री-अपरात्री आलेल्या अनेकांच्या जेवणाची-निवाऱ्याची व्यवस्था त्या करीत असत. गोरगरीबांच्या सेवेमुळे त्या परिसरात अत्यंत लोकप्रीय होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, दोन मुली, पाच नातवंडे असा परिवार आहे.