माथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, June 18, 2021

माथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर

 

माथेरान येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिर 

शुभारंभ पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न 

चंद्रकांत सुतार-माथेरानमौजे दस्तुरी (माथेरान) ता. कर्जत येथे अश्वांचे जंतनाशक लसीकरण व उपचार शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

      यावेळी माथेरान नगपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणा प्रसाद सावंत व इतर पदाधिकारी, प्रांताधिकारी वैशाली ठाकूर परदेशी, पोलीस उपअधीक्षक श्री.अनिल घेरडीकर, तहसिलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले आदी उपस्थित होते.    माथेरान या पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून घोड्यांचा उपयोग या ठिकाणी केला जातो. अश्वांचा वाहतुकीसाठी वापर करून येथील स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होतो. या अश्वांच्या आरोग्याची योग्य काळजी राखण्यासाठी त्यांना जंतूनाशक लसीकरण व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.

No comments:

Post a Comment