राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती साधेपणाने साजरी... - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, June 25, 2021

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती साधेपणाने साजरी...

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४७ वी जयंती साधेपणाने साजरी...

भिमराव कांबळे -कोल्हापुर समतेची शिकवण देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी आज सकाळी ८ वाजता कसबा बावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस या येथील शाहू महाराजांच्या  प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.


राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील जन्मस्थळावरील शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्या नंतर ऐतिहासिक दसरा चौकातील शाहूंच्या  पुतळ्यास पुष्पहार घालून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी खासदार संभाजी राजे छत्रपती,खासदार  संजय मंडलिक, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,  आ. चंद्रकांत पाटील, आ .ऋतुराज पाटील, आ.चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment