सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांची वर्णी लागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठराव
ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम
सिडको हे राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी हे महामंडळ लागल आहे. त्यामुळे हे महामंडळ राष्ट्रवादीकडे जाणार असून सिडको महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नांवावर एकमत होणार असल्याची चर्चा असली तरी आज कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झाली त्यात माजी आमदार सुरेश लाड यांना महामंडळाचे अध्यक्षपद मिळावं असा ठराव रायगड जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी मांडला. त्या ठरावाला माजी जि.प.अध्यक्ष सुरेश टोकरे,अशोक भोपतराव माजी सभापती ,तानाजी चव्हाण,एकनाथ धुळे,शरद लाड आदींनी अनुमोदन दिले.