Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिका ठरत आहे जीवनदायनी

 शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णवाहिका ठरत आहे जीवनदायनी  

                संदीप फडतरे- माण

माण खटावचे दातृत्ववान नेतृत्व म्हणून ओळख असलेले शिवसेनेचे युवानेते शेखरभाऊ गोरे कोरोनाच्या या लढाईत जनतेसोबत दिसून येत आहेत . विविध कोविड सेंटरला सर्वतोपरि मदत करण्याबरोबरच कोरोना बाधित रूग्णांच्या सेवेसाठी त्यांनी सर्वसोयीनियुक्त दोन रूग्णवाहिकाही लोकार्पण केल्या आहेत . आज या रुग्ण वाहिका अनेकांचे जीव वाचवताना दिसून येत आहेत.रूग्णांची ने आण करणाऱ्या या रूग्णवाहिका कोरोना बाधितांसाठी जीवनदायिनी बनून राहिल्या आहेत . माण खटाव तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर बहुतांश लोक या जीवघेण्या रोगाचा सामना करत आहेत.यादरम्यान बेड , ऑक्सिजन , व्हेंटीलेटर , रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही वेळेवर उपचार होत नाहीत , रूग्णांना ने - आण करण्यासाठी रूग्णवाहिका मिळत नाहीत अशा कारणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . माण खटाव तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे शेखरभाऊ गोरे यांनी सुरूवातीपासूनच सामाजिक बांधीलकी जपत स्वखर्चाने जनतेची सेवा केली आहे.कोट्यावधी रूपये त्यांनी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी खर्ची केलेत.तर दुष्काळी परिस्थितीत १६ टँकरद्वारे जनतेची तहान भागवलीय . कोणत्याही निधीची , फंडाची वाट न पाहता स्वखर्चातून विविध विकासकामे , जलसंधारणाची कामे , शैक्षणिक , तसेच गरजू , गरीब लोकांना आर्थिक मदती केल्या आहेत.रूग्णांच्या सेवेसाठी आईच्या स्मरणार्थ रूग्णवाहिका लोकार्पण केली होती.यामुळे आजपर्यंत वेळेवर उपचार मिळाल्याने मतदारसंघातील हजारो रूग्णांचे प्राण वाचले आहेत . जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एकदा शेखरभाऊ गोरे कोरोनाच्या या जीवघेण्या लढाईत उतरले आहेत.पहिल्या रूग्णवाहिकेच्या जोडीला अजून एक रूग्णवाहिका लोकार्पण केली आहे . दहिवडी कोविड सेंटरला १८ ऑक्सिजन बेड तर महिमानगड कोविड सेंटरला १५ बेड दिलेत.त्यांनी दिलेल्या दोन रूग्णवाहिका दोन्ही तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची ने आण करताना दिसून येत आहेत.रूग्ण वेळेवर कोविड सेंटरला पोहचत असल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार होत आहेत.तर जास्त त्रास होत असलेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी विविध ठिकाणी नेआण करण्याचेही कार्य या रूग्णवाहिका करत आहेत . कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी झालेल्या बीलातही सवलत मिळवून देण्यासाठी तसेच प्रसंगी स्वत : बील भरण्याचेही काम शेखरभाऊ गोरे करत आहेत . शेखरभाऊ गोरेंच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies