लाईव्ह टू गीव संस्थेकडून माथेरान मध्ये आदिवासी कुटूंबाना धान्यकिट वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, June 23, 2021

लाईव्ह टू गीव संस्थेकडून माथेरान मध्ये आदिवासी कुटूंबाना धान्यकिट वाटप

 लाईव्ह टू गीव  संस्थेकडून माथेरान मध्ये आदिवासी कुटूंबाना धान्यकिट वाटप 

 अश्वखाद्य, कुत्रे, माकडांना ही  खाद्य वाटप 

चंद्रकांत सुतार--माथेरानसलगदुसऱ्या वर्षी  मार्च महिन्या पासून कोरोना मुळे लॉक डाऊन निर्भन्ध  लागल्याने  अनेक कुटूंब उधस्तं झाले अनेकांना बिकट परिस्थितीला  सामोरे जावे लागतेय,

   माथेरान थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण हे केवळ येण्याऱ्या पर्यटकांवर येथील जनजीवन अवलंबून असल्याने  सर्व जनता ,जीवनमान चिंतेत पडली आहे, माथेरानच्या पायथ्याशी अनेक आदिवासी वाड्या आहेत  जे आदिवासी  पोटाची खळगी भरण्यासाठी रोज  माथेरांनचा डोंगर पाय व वाटेने चढाव चढून  किमान 5 ते 8 किलोमीटर  पायी चालत माथेरान ला कामे धंद्या साठी येत असतात आयुष्य भर प्रचंड अंगमेहनत करूनच आपले कुटंब जीवनमान जगत असतात  अश्या कुटूंबाना कोरोनाचा खूप फटका बसत आहे, कोरोना काळातसर्वच व्यवसाय  काम धंदे बंद  राहिल्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा हा  मोठा यक्षप्रश्न ह्या आदिवासी बांधवांपुढे आहे अशा  कठीण प्रसंगी मुबई येथील लाईव्ह टू गिव या संस्थेचे संस्थापक मारझे पारेख  यांच्या माध्यमातून  दस्तुरी येथे आज माथेरान  पायथ्याशी राहणाऱ्या  आदिवासी कुटूंबाना धान्य किट वाटप करण्यात आले, संस्थेचे  सदस्य  पूनम संमतांनी  विकी डिसिल्व्हा  भावना रिसंघाणी  अंकित  व्होरा  या वेळी उपस्थित होते , आजच्या आदिवासी कुटूंबाना किट  वाटप चे सर्व नियोजन माथेरान माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केल्या बदल  संस्थेच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले,  
लाईव्ह टू गीव या संस्थेच्या माध्यमातून मागील महिन्यातही येथील  अश्वखाद्य व मुक्या  येथील कुत्रे माकडांना  खाद्य वाटप करण्यात आले होते  आज माथेरान च्या पायथ्याशी आसलेल्या  हाशची पट्टी, धोदाणीवाडी ,बुरुज वाडी वरोसा वाडी पिरकत वाडी काटवण वाडी अश्या  सर्वच आदिवासी कुटूंबाना आज धान्य किट वाटल्याने, माजी नगराध्यक्ष मनोज  खेडकर यांनी समस्त माथेरान च्या वतीने आभार  व्यक्त करण्यात आले आजच्या किट वाटप प्रसंगी  संतोष लखन,आदित्य भिलारे, केतन रामाने ,अंकित पार्टे,शेखर रांजणे विशाल बिरामने,यश शिंदेआदींनी मोलाचे सहकार्य केले,लॉक डाऊन काळात माथेरानच्या गरजू लोकांना , प्राण्यांना मदत करणाऱ्या कित्येक  संघटना  दानशूर नागरिक अगदी देवासारखे देवदूत धावून आल्यानेच दोन घास सुखाचे आधाराने माथेरान कर  ऋणानुबंधनात सुखावला आहे,

No comments:

Post a Comment