Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे

 कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे

आमदार महेश शिंदे यांची मध्यस्थी यशस्वी;सोमवार पर्यंत होणार पगार

प्रतीक मिसाळ -कोरेगाव



कोरेगाव : आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईनंतर कोरेगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला . आ . शिंदे यांनी ऑन दि स्पॉट पगाराबाबत तोडगा काढला असून , सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर एका महिन्याचा तर पुढच्या पंधरवड्यात दुसऱ्या महिन्याचा पगार केला जाणार आहे . कोरेगाव नगरपंचायत कर्मचारी संघटनेने गुरुवारी रात्री उशिरा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता . शुक्रवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले होते . कोरोना केअर सेंटरमध्ये एकही कर्मचारी गेला नव्हता . कर्मचाऱ्यांच्या अडचणींविषयी राहूल बर्गे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी आमदार महेश शिंदे यांच्याशी चर्चा करुन , वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती .

त्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला . कोरोना काळात तुमच्यावर आलेला प्रसंग बाका आहे , हे मी जाणतो , मात्र काही प्रशासकीय अडचणी असल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता . आता आम्ही यामध्ये लक्ष घातले आहे . माझी जिल्हाधिकारी शेखर सिंह , जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट व मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा झालेली आहे . त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे . त्यामुळे सोमवारी बँकांचे कामकाज सुरु झाल्यानंतर एका महिन्याचा पगार केला जाणार आहे , त्यानंतर नगरपंचायतीचे आर्थिक नियोजन पाहून , लवकरात लवकर दुसऱ्या महिन्याचा पगार देखील अदा केला जाणार असल्याचे आ . शिंदे यांनी सांगितले . नगरपंचायत ऐवजी नगरपालिका करण्याचे आपले नियोजन असून , राज्य शासनस्तरावर हा विषय मान्यतेसाठी आहे , नगरपालिका झाल्यास , कर्मचाऱ्यांचा प्रश्न आपसूक सुटणार आहे , नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे . लॉकडाऊन नंतर याबाबत त्वरित निर्णय होईल , असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले .

कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित बर्गे , सुरज मदने , प्रताप बुधावले यांनी अडचणी विषद केल्या . मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी नगरपंचायतीचे आर्थिक गणित कसे आहे , याची माहिती दिली . आ . शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कर्मचारी संघटनेने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले . आ . शिंदे यांनी कर्मचारी संघटनेला वाऱ्यावर सोडणार नाही , त्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन , ते कायमस्वरुपी सोडविणार असल्याचे स्पष्ट केले .बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , नगराध्यक्षा रेश्मा कोकरे , राहूल बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , नगरसेवक सुनील बर्गे , महेश बर्गे , जयवंत पवार , राहूल र . बर्गे , निवास मेरुकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते . 


८७ कर्मचाऱ्यांना दोन हजारांचे किराणा सामान 


आमदार महेश शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . बैठकीत अनेक कर्मचाऱ्यांना परिस्थिती सांगताना आश्रु अनावर झाले होते , तोच धागा पकडत आ . शिंदे यांनी जागेवरच ८७ कर्मचाऱ्यांना आजच्या आज प्रत्येकी दोन हजार रुपयांचे किराणा सामान घरपोहोच करणार असल्याचे जाहीर केले . त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे . आमदार शिंदे यांनी लक्ष घातल्याने आमचे प्रश्न लवकरात लवकर सुटतील , असा विश्वास कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला . 


पदाधिकारी , नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी केले कोरोनाबाधित वृध्देवर अंत्यसंस्कार

कर्मचारी संपावर गेले असतानाच , शहरातील एका वृध्देचा कोरोनाने मृत्यु झाला , ही बाब समजताच , नगरपंचायत कार्यालयातील बैठक आटोपती घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे , नगराध्यक्षा रेश्मा कोकरे , उपनगराध्यक्षा मंदा बर्गे , माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे , उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समितीचे सदस्य सुनीलदादा बर्गे , नगरसेवक महेश बर्गे , संतोष कोकरे , किशोर बर्गे यांच्यासह मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वत : पीपीई कीट धारण करुन वैकुंठ स्मशानभूमीत वृध्द महिलेवर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार केले . पदाधिकारी , नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने शहरवासियांनी त्यांचे अभिनंदन केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies