नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली
6/17/2021 11:26:00 PM
0
कालपासून माथेरान मध्ये जोरदार पाऊस असून गेल्या 24 तासात माथेरान मध्ये 227.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून इतक्या जोरकसपणे पडणाऱ्या पावसाने आज पहाटेच्या सुमारास नेरळ माथेरान घाटात दरड कोसळली,दरड कोसळली त्यावेळी पहाटेचे 4 वाजले होते,रस्त्यावर वाहतूक नसल्याने कोणीही जखमी झाले नाही,अन्यथा मोठा अनर्थ घडला असता,यानिमित्ताने घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी माथेरानकर करत आहेत.
Tags