एस टी कामगारावरील अन्याय बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन
उमेश पाटील -सांगली
महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने एस टी महामंडळाचे विभाग नियत्रंक अरुण वाघाटे यांना एस टी कामगारावरील अन्याय बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.
महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने दि २४.०६:२०२१ रोजी विभाग नियत्रंक यांना विभागातील कामगारावर होणा-या अन्यायाबाबत उदाहरणासह सविस्तर माहिती देण्यात आली याबाबत महत्वाचे मुददे खालील प्रमाणे
१. विभागामधील रोजंदार गट नं २ वरील कर्मचा-यांना कोरांना महामारीच्या कालावधीमध्ये एस टी बंद असल्यामुळे लॉकडॉऊन
कालावधी म्हणुन वेतन देण्याची मंजुरी महामंडळाने दिल्यानंतर सदर कर्मचा-यांना अदयाप वेतन दिले नाही. सदर वेतन तातडीने
अदा करण्यात यावे.
२. रोजंदार गट क्रं १ वरील २५८ कर्मचा-यांना वेतन देण्याबाबत महामंडळाकडे सविस्तर मागणी पत्र सादर करण्यात आले.
३. विभागामधील कामगारावर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई ब-याच आगारामधुन करण्यात आली आहे सदर निलंबन
बेकायदेशीर असल्याने यासर्व प्रकरणाची चौकशी करुन निलबंन चुकीचे झालेले असल्यास सबंधित अधिका-या विरुध्द कारवाई
करण्याची आणि कामगारावर झालेला आणि होणारा अन्याय दुर करण्याची मागणी करण्यात आली.
निलबंन हे चौकशीसाठी करणे आवश्यक असताना चौकशी पुर्ण झालेनंतर निलबंन करण्याची जी प्रशासनाची घोडचुक
आहे ती तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.
४. विभागामध्ये रिक्त असणा-या पदावर खात्यामार्फत बढतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या कामगाराना बढती देण्याबाबतची मागणी
करण्यात आली आणि प्रशासनाने सदर मागणी मान्य करुन १ जुलै २०२१ नंतर अशा बढत्या देण्याचे मान्य केले.
विनती बदली मागणा-या कर्मचा-यांच्या विनंती बदल्याचा विचार जुलै २०२१ मध्ये करण्याचे मान्य करण्यात आले.
५.
वरील प्रमाणे मुददे निहाय चर्चा झाली याबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास प्रशासनाच्या मनमानी विरोधात तीव्र
अंदोलन छेडावे लागेल असा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रकाश हंकारे आणि शिवसेना जिल्हा संघटक श्री बजरंग (भाऊ)
पाटील यांनी दिला या वेळी संघटनेचे सचिव श्री प्रकाश कदम, विभागीय कार्यालयाचे अध्यक्ष श्री इम्रान आमिन, सचिव श्री
रत्नदिप कुदळे , श्री संदीप माळी, श्री संतोष नागमोती इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.