Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत आणि चर्च वरील भाग ढासळला असून किल्ल्याचे इतर वास्तू ढासळण्याची शक्यता.

 प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे द्रोणागिरी किल्ल्याची प्रवेशद्वार भिंत आणि चर्च वरील भाग ढासळला असून किल्ल्याचे इतर वास्तू ढासळण्याची शक्यता.

अमूलकुमार जैन - अलिबाग  

  रायगड जिह्यातील ता.उरण येथील ऐतिहासिक किल्ले द्रोणागिरीचे प्रवेशद्वाराची भिंत आणि चर्चवरील भाग दि.१३ जून २०२१ रोजी ढासळला. हि घटना अत्यंत गंभीर असून असे होत राहिले तर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जमिनिदोस्त होण्याच्या मार्गावर होण्याची भीती आहे. द्रोणागिरी किल्ला हा असंरक्षित स्मारक आहे. काही दिवसांपूर्वी किल्ल्याच्या डोंगर फोडण्या संदर्भातील वृत्तपत्रात बातम्या हि प्रसारित झाल्या होत्या. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा पावसाळ्यात बिकट होत आहेत. तसेच सध्या किल्ल्यावरील चर्च,तटबंदी,बुरुज आणि पाण्याचे टाके/हौद या ऐतिहासिक (हेरीटेज) वास्तू आहेत. या किल्ल्याचा डोंगर हा ONGC आणि वन विभाग यांच्यात विभागला असून दोन्ही कडून दुर्ग अवशेष संवर्धन होत नाहीत. तसेच यांच्या हद्दीचे फलक कोठेही लावण्यात आलेले नाहीत.



     सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था द्रोणागिरीवर गेल्या ६ वर्षापासून दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. या दरम्यान वन विभाग,जिल्हाधिकारी,

तहशिलदार आणि राज्य पुरातत्व विभाग यांना किल्ल्याच्या वास्तूंची होणारी पडझड छायचित्रे व पत्रे देण्यात आली आहेत. परंतु यावर अद्याप कोणतीही कारवाई किंवा पाऊले उचलण्यात आलेले नाहीत. तसेच या किल्ल्यावरील दुर्ग अवशेष राज्य पुरातत्व विभाग अंतर्गत संरक्षित करण्यात यावे असे पत्र दि.१६मार्च २०१८ रोजी मा.संचालकाना देण्यात आले. परंतु गेली ३वर्ष या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. योग्य वेळी कारवाई झाली नाही म्हणून आज किल्ल्याच्या वास्तू पडझड होत असून याला शासकीय अकार्यक्षमता जबाबदार आहे. तरी सदर विषयात झालेला निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष याला जबाबदार कोण याची शासनाने चौकशी करावी.शासकीय अकार्यक्षमतेमुळे आज रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक द्रोनागिरी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणत होत आहेत. तरी या संदर्भात संस्थे मार्फत संचालक,सहायक संचालक (राज्य पुरात्तव विभाग),उरण तहशिलदार,रायगड जिल्हाधिकारी,वन विभाग,रायगड,मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्रे देण्यात आली असून त्यांनी या विषयात लक्ष घालून पडझड झालेली वास्तू हि राज्य पुरातत्व निकषाने लवकरात लवकर डागडुजी कराव्यात अशी मागणी करण्यात आली.असे संस्थेचे दुर्ग संवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले.

 भविष्यात जर पूर्ण किल्ला ढासळला तर हा रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल अथवा नष्ट होऊ शकतो. अशी भीती संस्थेचे उरण विभाग प्रमुख अभिषेक ठाकूर यांनी व्यक्त केली.

इतिहास- उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधण्यात आला. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies