महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, June 17, 2021

महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र मिरर टीम -अलिबाग कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी राज्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. या परिस्थितीत करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता सर्वात जास्त आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात घेवून त्यांच्यासाठी महाडच्या  उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड आपल्या सहकाऱ्यांसह स्तुत्य उपक्रम सुरु केला. 

       यादृष्टीने उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता सुरक्षित असे सर्जिकल गाऊन (Surgical Gown) आणि ॲप्रन व कॅप (Apron, Cap) असे संच शिवून घेण्याचे नियोजन केले. यासाठी पेण येथील व्यापारी श्री. चिखले यांच्याकडून कापड खरेदी केले. श्री.चिखले यांनी सामाजिक भावनेतून अगदी कमी किंमतीमध्ये हे कापड उपलब्ध करून दिले. पोलादपूर तालुक्यातील सावित्री महिला बचतगट, कापडे यांनी या कापडातून अत्यंत कमी वेळेत व किफायतशीर दरात उत्कृष्ट प्रतीचे सर्जिकल गाऊन, ॲप्रन व कॅप चे 190 संच शिवून दिले. 

नुकतेच या संचाचे वाटप महाड विधानसभा आमदार भरत गोगावले, महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, महाड तहसिलदार सुरेश काशीद, बचतगटाच्या प्रतिनिधी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एमएमए कोविड सेंटर, महाड येथील डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

करोनाच्या संकटात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञतेची भावना मनात ठेवून उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड व त्यांच्या इतर सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे. यावेळी वैद्यकीय सेवेशी निगडीत उपस्थित सर्वांनी श्रीमती प्रतिमा पुदलवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. 


No comments:

Post a Comment