इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२२ मधे अवघ्या १ वर्ष १० महिने असलेल्या गार्गीचे नाव ....! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, June 28, 2021

इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२२ मधे अवघ्या १ वर्ष १० महिने असलेल्या गार्गीचे नाव ....!

 इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२२ मधे अवघ्या १ वर्ष १० महिने असलेल्या गार्गीचे नाव ....! 

              प्रियांका ढम- पुणे 


कु. गार्गी ज्ञानेश बाठे ( जन्म दिनांक २० जून २०१९ )पुणे, महाराष्ट्र हिला कोवळ्या वयात(१ वर्ष १० महिने) खालील गोष्टींकरिता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् कडून गौरविण्यात आले.. १० शरीराचे अवयव ओळखून नावे सांगणे, ७ रंग ओळखून नावे सांगणे, ५ कार्टून ओळखून नावे सांगणे, ६ कृतीदर्शक शब्द सांगणे, ५ प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ओळखून नावे सांगणे, १३ पदार्थ ओळखून नावे सांगणे, ९ फळे ओळखून नावे सांगणे, ९ देवदेवता ओळखून नावे सांगणे, 22 वस्तू ओळखून नावे सांगणे, १० आकार ओळखून नावे सांगणे, ५ वाहने ओळखून नावे सांगणे, १२ प्राणी ओळखून नावे सांगणे, A-Z अक्षरे पाठांतर, १-१० अंक, इंग्रजी कविता पाठांतर, मराठी कविता पाठांतर, आठवड्याचे वार सांगणे आणि 4 प्राण्यांची नक्कल करून दाखवणे या सर्व बाबी अगदी लगेच करून दाखवते .


"खरंतर ह्या सर्व गोष्टी ती दीड वर्षांची असतानाच करत होती..परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे माझ्याकडून अर्ज करण्यास विलंब झाला होता असे तिची आई सांगते!"

मुलांना मारून मुटकून अभ्यास करून घेणे खरंतर मला फारसे आवडत नाही..माझ्या मते मुलांना त्यांचं बालपण जगू द्यावं आणि म्हणूनच मी तिला फार लवकर शाळेत घालण्याची घाई  करणार नाही..असच खेळता खेळता खाता ,पिता आम्ही तिला सगळं शिकवतो आणि ती ते सगळं लक्षात ठेवते असे महाराष्ट्र मिरर टीमशी संवाद साधताना गार्गीच्या आई वडिलांनी सांगितले.

ह्या यशामध्ये  तिच्या आई पप्पांसोबत आजी आजोबांचा पण मोलाचा वाटा  आहे.तिला श्लोक शिकवणे,सकाळी उठल्यावर प्रारंभी विनंती, संध्याकाळी शुभंकरोती , संध्याकाळचे श्लोक चांगल्या सवयी लावणे हे त्यांचेच श्रेय आहे असे गार्गीच्या मम्मीने 'महाराष्ट्र मिरर'शी बोलताना सांगितले .

No comments:

Post a Comment