Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सफाई कामगारांना हक्काची रक्कम तब्बल दोन वर्षानी मिळाली : काँग्रेस नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश

 सफाई कामगारांना हक्काची रक्कम तब्बल दोन वर्षानी मिळाली :  काँग्रेस नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या प्रयत्नांना यश

चंद्रकांत सुतार--माथेरान



आपल्या कष्टाने,कामाने समाजातील इतर लोकांचे जीवन सुखमय बनविणाऱ्या कामगारांना आपल्या हक्काची रक्कम  वेळेवर मिळणे हे अत्यन्त महत्वाचे आहे,ज्या कामाबद्दल सामान्य नागरिक नेहमीच नाक आणि तोंडाला रुमाल लावताना दिसतात, तेच काम परिस्थिती मुळे फक्त कुटूंबावरती लक्षकेंद्रित करत येणाऱ्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतात,मिळेल ते काम अगदी आनंदात करताना दिसतात  परंतु ह्या कामगारांचे  मेहनतीच्या कष्टावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या ठेकेदाराला ह्या कामगारांचे पीएफचे पैसे देताना अडचण यावी की मुद्दामपणा ! हे घृणास्पद गोष्ट आहे,  विनाकारण मुद्दामहुन सात पैकी दोनच कामगारांचे पीएफचे पैसे न देणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरतय अशी शंका निर्माण होते? सतत दोन वर्षे केवल हक्काचे आमचे पीएफचे पैसे द्या यासाठी अनेकांकडे हेलफाटे मारून  काहीच होत नसल्याने, शेवटी सफाई कामगार आशा  गायकवाड, व मनोहर पारधी यांनी ही बाब काँग्रेस नगरसेवक शिवाजी शिंदे यांना सांगितली, 

त्या नंतर  शिवाजी शिंदे यांनी वारंवार संबंधित ठेकेदाराला फोन करत कामगारांचे पीएफचे पैसे देण्यास सांगितले होते, परंतु ठेकेदार टाळाटाळ करत असल्यांने  आपल्या स्टाईलने शिवाजी शिंदेंनी ठेकेदारास सूनावल्यावर  आज दि.२५ जून रोजी पारधी आणि गायकवाड यांची पीएफची रक्कम दोघांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, नाक दाबल्यावर तोंड उघडतेच ही म्हण इथे सार्थकी लागते.प्रत्येकी बारा हजार रुपयांची रक्कम ही सध्याच्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत खूपच महत्वाची असल्याने या दोन्हीही कामगारांना अश्रू अनावर झाले शिवाजी शिंदेंनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली काँग्रेस पक्षाने नेहमीच कामगार, दलितवर्गासाठी हिताचेच धोरण राहिल्याने आज त्याचा प्रत्यय आला आहेच, दोन कामगारांची थकीत पीएफची रक्कम आज जमा नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्यामुळेच झाल्याने जेवढा आनंद मागील कामगारांना आपली पीएफची रक्कम घेताना झाला नसेल तेव्हढा अधिक आनंद अश्रू द्वारे व्यक्त  केला, ह्या भावनिक क्षणी  दोन्ही कामगारानी नगरसेवक शिवाजी शिंदे यांना पेढा देऊन ऋण आनंद साजरा केला.

आमच्या कष्टाच्या पैशाबाबत अनेकांना आम्ही सांगून सांगून अक्षरशः वैतागून गेलो होतो. एकही अधिकारी नाही की ज्याला आम्ही आमच्या या अडचणी बाबतीत सांगितले नसेल पण काहीच उपयोग झाला नाही. नगरसेवक शिवाजी शिंदे हे देवासारखे भेटले म्हणून तरी मला अडचणीच्या वेळेस ठेकेदाराकडून बारा हजार रुपयांची माझी कष्टाची रक्कम मिळाली आहे.

मनोहर पारधी --सफाई कामगार


आम्ही  सात सफाई कामगारांचे  पीएफचे पैसे कॉन्ट्रॅक्टरने देताना फक्त आम्हा दोघाचेच पैसे जाणिवपूर्वक  रखडून ठेवले , ही बाब सर्वाना सांगूनही कोणीच लक्ष दिले नाही, या बाबत  नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्याकडे  ही बाब सांगताच त्यांनी प्रयत्न करून, आम्हाला आमचे पीएफचे पैसे मिळून दिले आहेत आमच्या साठी खुप खुप मेहनत प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही नगरसेवक शिवाजी शिंदे यांचे ऋणी आहोत.

  आशा गायकवाड-महिलासफाई कामगार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies