नेरळ, कर्जत,खालापूर, पेण,वडखळ इथल्या कारच्या सायलेन्सरची चोरी करणाऱ्या टोळीला कुर्ला येथून अटक
अमूलकुमार जैन,-अलिबाग
रायगड जिल्ह्यातील नेरळ,खालापूर, वडखळ,कर्जत पेण येथे इको गाडीचे सायलेंसर चोरीस गेले होते.सदर गुन्ह्यांतील इको गाडीचे सायलेंसर चोरणाऱ्या टोळीस मुंबई कुर्ला येथून अटक करून त्यांच्याकडून 24 इको गाडीचे सायलेंसर जप्त करीत आत्तापर्यंत 3, 90,500/-रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने केले आहे.
वडखळ पोलीस ठाणे गुन्हा रजि नं 65/2021 भादवि कलम 379, या गुन्ह्यात तीन इको गाडीचे सायलेन्सर चोरीला गेले होते. या प्रकारचे गुन्हे नेरळ,खालापूर, वडखळ,कर्जत पेण, या ठिकाणी देखील दाखल आहेत. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्याकडून करण्यात येत होता. सदर तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांच्या पथकाला सायलेन्सर चोरी करणारी टोळी कुर्ला मुंबई त्याचे कार्यरत असल्याचे समजले. त्यावरून नमूद पथकाने कुर्ला येथून खालील आरोपी त्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मिनाज अब्दुल करीम खान,सैफ दिलशाद खान, आकाश जीतराम शर्मा,( सर्व राहणार कुर्ला मुंबई ) आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 24 इको गाडीचे सायलेंसर जप्त करण्यात आले आहे . नमूद आरोपी त्यांचेकडून सन 2020 सालचे 5 गुन्हे व 2021 सालाचे 5 गुन्हे उघडकीस आले आहे. नमूद आरोपी यांच्याकडून सदर आरोपी यांनी अशाच प्रकारचे गुन्हे नवी मुंबई, पनवेल ,कळंबोली, उरण पिंपरी-चिंचवड, तसेच गुजरात, व राजस्थान, या ठिकाणी केले आहेत. गुन्हा करताना वापरले जाणारे वाहन वॅगनर कार देखील आरोपी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शेलार हे करीत आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदारअमोल हंबीर, पोलीस हवालदार स्वप्नील येरुंकर, पोलीस हवालदार सचिन शेलार, पोलीस शिपाई अनिल मोरे, यांनी बजावली आहे,.