Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुड्स' Unpredictable' (अनप्रेडिक्टबल) या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 'मुड्स'  Unpredictable' (अनप्रेडिक्टबल)
या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

 प्रियांका ढम - पुणे







नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले, योग्य वेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो, वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नाते संबंधांतील संवेदनशील विषयावर      सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  'मुड्स - Unpredictable' असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे.

एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज पुण्यात लॉंच करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते संतोष अंकुश चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाची निर्मिती एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट  या बॅनर खाली निर्माते संतोष अंकुश चव्हाण यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन  आणि दिग्दर्शन  महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असले तरी बोरकर हे मागील 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक तसेच विविध मालिकांचे लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली आहे.

आगामी  'मुड्स - Unpredictable' या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर म्हणाले, आयुष्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही कथा आहे.हल्ली आपण फार यांत्रिक म्हणजे  रोबोट सारखे जीवन जगतोय. संवेदशीलता हरवून चाललीय.कोणतेही नाते टिकण्यासाठी, फुलण्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो,नात्यात सुसंवाद नसेल तर ते नाते, रिलेशनशिप फक्त नावाला असते. एखादी घटना वाईट घडली म्हणजे संपूर्ण आयुष्यच वाईट नाही, आयुष्य अधिक  सुंदर कसे करता येईल, नाते कसे फुलवता येईल हे मनोरंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. हा चित्रपट प्रत्येकाला नात्याबद्दल नवीन विचार देईल.मुडस या सायको थ्रिलर नंतर महेन्द्र बोरकर, या तरुणाईला समर्पित  बॉईज वर्सेस गर्ल्स हा नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत.बॉईज वर्सेस गर्ल्स ही धमाल कॉमेडी आणि फुल मनोरंजनाची मेजवानी असेल.आपल्याला वय विसरून प्रेमात पाडणारी गोष्ट असेल.

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, कोरोना काळानंतर आता नवनवीन चित्रपट तयार व्हावेत, निर्मात्यांनी पुढे यावे आणि चित्रपटसृष्टीचे काम पुन्हा जोमावे सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies