अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात गेला वाहून !! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, July 11, 2021

अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात गेला वाहून !!

 ब्रेकिंग न्यूज !

(एक जण वाहून गेलेला तो सापडला असून तो मृत झाला आहे त्याचे नाव चव्हाण आहे ही बातमीत अपडेट आहे

अलिबाग- मुरुड रस्त्यावरील काशिद गावाजवळील नदीवरील जुना पूल जोरदार पावसात गेला वाहून !!

अमूलकुमार जैन-मुरुड


सदर घटना सायंकाळी घडली असून मुरुड तालुक्यात पावसाची संततधार सुरु असून नदीत आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हा पन्नास वर्षाचा जीर्ण झालेला पुल वाहून गेल्यामुळे अलिबाग-मुरुड हा रस्ता बंद झाला आहे. एक चारचाकी वाहन व एक मोटार सायकल सहपूल कोसळला असून मोटारसायकल वरील एक स्वार पाण्यात वाहून गेला होता त्याचा शोध घेतला असता मिळून आला आहे असे मुरूडचे नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच सदर पुलाच्या स्लॅबला मोठे विवर पडले होते त्याकडे स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले होते.कसे पोहचाल मुरुडला

मुरूड येथून अलिबाग येथे येण्या जाण्यासाठी सुपेगाव मार्गे साळाव ब्रिज ,रेवदंडा असा वळसा घेऊन प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे जवळपास चाळीस किलोमीटर चा वळसा घ्यावा लागणार आहे


No comments:

Post a Comment