Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आईला ठार मारून तिचे काळीज खाणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

 आईला ठार मारून तिचे काळीज खाणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

भिमराव कांबळे -कोल्हापुर 


स्वतःच्या जन्मदात्या आईला ठार मारून तिचे काळीज खाणाऱ्या सुनील कुचकोरवी या निर्दयी नराधमाला आज जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार वकील विवेक शुक्ल यांनी काम पहिले. 

     कावळा नका परिसरातील माकडवाला वसाहत येथे मयत यलव्वा कुचकोरवी ही आपल्या मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन  असल्यामुळे तो वारंवार आपल्या आईशी भाडंण करत होता. त्याने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी आईकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. आई पैसे देत नसल्याच्या रागातून चाकू, सूरी, सत्तूर अश्या धारदार शस्त्रांनी त्याने निर्दयपणे आपल्या आईचा खून केला. याही पुढे जाऊन निर्दयीपणाचा कळस म्हणजे त्याने आईच्या शरीरातील अवयव बाजूला काढून ते शिजवून खाण्याचा क्रूरपणा केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली होती. शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हाचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. आज या खटल्याच्या सुनावणी दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी सुनील कुचकोरवी याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पहिले. सरकारी वकील शुक्ल यांनी १२ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील कोचकोरवी याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश परीट, एम एम नाईक यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies