कोरोना वॉरियर्स " ठरलेल्या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 1, 2021

कोरोना वॉरियर्स " ठरलेल्या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार

 "कोरोना वॉरियर्स " ठरलेल्या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त  सत्कार

 प्रियांका ढम- पुणे

 डॉक्टर्स डे च्या  निमित्ताने भारतीय जनता पार्टी लोणीकाळभोर शहर च्या वतीने परिसरातील अनेक डॉक्टर्सना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. विशेषतः कोविडच्या काळात स्वतःच्या जिवाची बाजी लावून लाखो लोकांचे जीव वाचवणारे डॉक्टर्स हे देवदूतापेक्षाही कमी नाहीत याची जाणीव आपणा सर्वांना झाली. आजच्या दिवसाचे औचित्य साधून या छोट्याशा उपक्रमाद्वारे त्यांच्या कार्याचा गौरव व आभार प्रदर्शन करण्याचा एक प्रयत्न केला. 


लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रमुख डॉक्टर डी. जी. जाधव साहेब व डॉक्टर रुपाली बंगले मॅडम, डॉक्टर तलाठी, डॉक्टर राहुल जगताप, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर मोहिनी भोसले, श्री व सौ डॉक्टर तांदळे , श्री व सौ डॉक्टर रासकर , डॉक्टर केतन कुंभार (सुयश हॉस्पिटल). विश्वराज हॉस्पिटलचे डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर पी के देशमुख, डॉक्टर रूपा शर्मा, डॉक्टर खारतोडे ‌, डॉक्टर खंडाळे, डॉक्टर अर्चना वाघमारे, डॉक्टर नामदेव जगताप, शिवम हॉस्पिटल च्या सौ डॉक्टर अंजली काळभोर मॅडम, डॉक्टर नागरे सर, श्री प्रशांत निंबाळकर सर, राईलकर हॉस्पिटलचे सन्माननीय डॉक्टर श्री आनंद राईलकर या सर्व डॉक्टर्स ला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नाना काळभोर, लोणी काळभोर शहर भाजपाध्यक्ष कमलेश काळभोर, महिला पदाधिकारी सौ मंजुश्री साबू, सौ सविता वर्मा, ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीरंग लोखंडे मामा, उद्योजक गोपाळजी वर्मा, मंगेशजी काळभोर, मल्हार पांडे, करण पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment