Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोकणवासीय समाज संस्थेनी केले सोशल मीडियाद्वारे कोरोना लसीकरण करण्याबाबत आवाहन

 कोकणवासीय समाज संस्थेनी केले सोशल मीडियाद्वारे कोरोना लसीकरण करण्याबाबत आवाहन

समाजबांधवांकडून उस्फुर्त सहकार्य

चंद्रकांत सुतार---माथेरान

मागील वर्षी कोरोना व्हायरसने  संपूर्ण देशाला विळखा घातल्या नंतर ठीक ठिकाणी त्याचा गंभीर परिणाम दिसून आला, अनेकांचे  जीवनमान उध्वस्त झाले आपल्या  कुटूंबातील, व्यक्ती, मित्र परिवार, पैकी कोणीतरी आपल्याला सोडून गेले होते ,प्रचंड प्रमाणात मानसिक वेदना दायक जीवन जगत असताना  कोरोना व्हायरस वर लस येणे आवश्यक होते त्याच बरोबर नागरिकांनीही  नियमावलीचे पालन करणे अपेक्षित होते, तरच कोरोना सारखा महाघातक आजाराला  आपण थांबऊ शकू मागील वर्षी तसेच ह्याही वर्षी सलग दोन वर्षे कोरोना परिस्थितीमुळे  नोकरी व्यवसाय सर्व काही ठप्प झाल्याने , जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे, हळूहळू कोरोनवर उपाय लस येऊ लागल्या आहेत, जनजागृती होत आहे, लोकांनी कोरोना बाबत सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत त्यामुळे आता सर्व नागरिक तोडाला मास्क लावणे लस घेणे या साठी पुढे येत आहेत, त्यामुळे  ठीकठिकाणी लस पुरवठा होत असला तरी तुटवढा  जाणवत आहे,  कोकणवासीय समाज संस्थेने सोशल मीडियाच्या माध्यमातूनआपल्या सर्व समाज बांधवांना  लस घेण्याचे आवाहन करत ज्यांनी कोरोना लसचा एक डोस ,दोन डोस किंवा आता पर्यंत घेतलेच नाही अशांनी ग्रूपवर ठराविक निशानी करा असे आवाहन केले  होते त्याला उत्तम प्रतिसाद सहकार्य,गेल्या दोन दिवसात कोकणवासीय समाज संस्थेच्या  ग्रुपवर बघायला मिळाला, त्यामुळे शिल्लक असलेल्या सदस्यांना लस घेण्याचे विंनती करून  काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांनी दूर करून लस देण्यास सहकार्य करीत आहेत.

बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या आपल्या ब्रीद वाक्या नुसार  आपले गाव आपली जबाबदारी ह्या कार्यातून कोकणवासीय समाजाचे अध्यक्ष शैलेंद्र दळवी हे हा स्तुत्य कार्यक्रम करत आहेत, कोकणवासीय समाज्याच्या सदस्या असलेल्या माथेरानच्या प्रथम नागरिक प्रेरणा प्रसाद सावंत यांनी ही कोरोना लसीकरणंबाबत  वेळोवेळी सूचना करून त्याबाबत उपाय योजना करीत आहेत,  तर लसीकरण केंद्रात मागील अनेक दिवसापासून समाजाचे कार्यकारणी सदस्य असलेले किशोर मोरे हे सामाजिक बांधिलकी जपत  लसीकरण केंद्रात  नागरिकांना  कर्मचारी वर्गाला सहकार्य करत आहेत, सोशल मिडियामाध्यमातून किमान आपल्या नागरिकांना लसीकरण घेण्यास प्रवृत्त करण्याचे मोलाचे कार्य कोकणवासीय समाज संस्था सध्या माथेरानमध्ये करत आहे त्यामुळे माथेरानच्या जडणघडण कार्यात कोकणवासीय समाजाचा मोलाचा हातभार लागत आहे हे नक्कीच,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies