काशीद पुलाचे काम त्वरित करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा.पालकमंत्री अदिती तटकरे - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, July 12, 2021

काशीद पुलाचे काम त्वरित करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा.पालकमंत्री अदिती तटकरे

 काशीद पुलाचे काम त्वरित करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा.पालकमंत्री अदिती तटकरे

अमूलकुमार जैन-अलिबाग


रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरूड ह्या राज्य महामार्गावरील काशीद पूल हा मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. ह्या दुर्घटना ग्रस्त झालेल्या पुलाची पाहणी पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी केली त्यावेळी त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांना काशीद पुलाचे काम त्वरित करून वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशा सूचना केल्या.

यावेळी पालकमंत्री यांच्यासमवेत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे,रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात  तसेच बांधकाम विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सदर दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी केली. त्याचप्रमाणे या दुर्घटनामध्ये मुरूड तालुक्यातील एकदरा येथील वाहून गेलेले मयत चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल असे देखील जाहीर केले.पालकमंत्री यांनी काशीद गावातील तसेच मुरूड तालुक्यातील जनतेबरोबर संवाद साधत शासन हे जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.शासन हे सर्वसामान्य जनतेचे आहे त्यामुळे जनतेच्या अपेक्षा ह्या शासनाकडून आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. त्याच प्रमाणे काशीद चा पूल हा लवकरात लवकर तयार करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना ही त्यांनी उपस्थित अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे आणि त्यांच्या कर्मचारी यांना दिले.No comments:

Post a Comment