पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली माण देशी फौंडेशन चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा मोठा हात
ओंकार रेळेकर-चिपळूण
माण देशी फौंडेशन ही सामाजिक संस्था कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागातील महिलांसाठी गेली अनेकवर्ष काम करीत आहे,महिला सक्षमीकरण ,महिला उद्योजक घडविणे,महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे,शेतकरी बांधवांच्या शेतमाला चांगली किंमत मिळवून देणे ,महिलांना उद्योग व्यवसायकारीता कर्ज उपलब्ध करून देणे इत्यादी महिलांसाठी महत्वपूर्ण कामे केली जातात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात चिपळूण शहर आणि तालुक्यात अनेक भागात नागरिकांचे मोठे नुकसान झाले अशा प्रसंगात माण देशी फौंडेशन चिपळूण वासीयांच्या मदतीला धावून आली आहे.महिलांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय करण्याकरिता माण देशी फौंडेशन च्या वतीने विशेष प्रशिक्षण दिले जाते यातून पुढे महिला व्यवसायातून स्वतःच्या पावलावर उभे राहण्याकरिता माण देशी ग्रामीण बँकेच्या वतीने बिन व्याजी कर्ज दिले जाते आता पर्यंत शेकडो महिलांनी कर्ज घेऊन यशस्वी उद्योजक बनण्याचा बहुमान मिळविला आहे.फौंडेशन मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाच या बिनव्याजी कर्जाच्या सुविधेचा लाभ मिळतो यातून एकूण ५०० महिलांना ३० लाख ५०० रु. कर्जाचे आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या मालाला थेट बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून माण देशी फौंडेशन हे विशेष प्रयत्न सुरू आहेत यातून सुमारे ६ लाख ५० हजार महिला शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.मोबाईल व्हॅन द्वारे ग्रामीण भागातील महिलांना उद्योगासाठी प्रशिक्षण दिले जाते.कोरोना काळात हजारो महिलांनी मोबाईल वरील डिजिटल मार्केटिंग पद्धतीचा अवलंब करून आपल्या व्यवसायाची जाहिरात करून लाखो रुपये कमावले असल्याची माहिती वनिता शिंदे यांनी दिली.फौंडेशन ची स्वतःची अँब्युलन्स असून ग्रामीण भागात महिलांना कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सेवा दिल्या सिटीस्कॅन यंत्रणेचीही सुविधा या मार्फत दिली जाते.अनेक ठिकाणी गरोदर महिलांकरिता पौष्टीक आहार देऊन मार्गदर्शन शिबिरही राबविले जातात . शिवाय रुग्णाची तपासणी करून गावोगावी नियमित उपयोगी असणारी औषधे गोळ्या मोफत दिल्या जातात ,माण देशी फौंडेशनच्या प्रशिक्षित महिलांनी कोरोना काळात सुमारे १६ लाख मास्क बनविले होते अशी माहिती शिंदे यांनी दिली.चिपळूण तालुक्यात ३० किमी पर्यंतच्या अंतरात असणाऱ्या सुमारे १००० पूरग्रस्त कुटुंबाना अन्न धान्य किट चे वाटप करण्यात येणार असून तांदूळ,डाळ,साखर,चहापावडर,मेणबत्ती,माचीस, मच्छर अगरबत्ती,साबण,मिठ, तेल,मसाला,शेंगदाणे आदी जेवणासाठी लागणाऱ्या महत्वाच्या घटकांचा या किट मध्ये समावेश आहे.वनिता शिंदे,भाग्यश्री सुर्वे,अपर्णा सावंत,रोहिणी लाड तसेच माण देशी फौंडेशन च्या सेविका या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.