रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी प्रशासनाकडून पूर्ण; - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 8, 2021

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी प्रशासनाकडून पूर्ण;

 रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी प्रशासनाकडून पूर्ण;

ग्रा.सदस्य संपत हडप यांच्या मागणीला यश 

नरेश कोळंबे-कर्जत

     

 कर्जत तालुक्यातील सर्वात खराब रस्ता मानण्यात येणाऱ्या कडाव ते आंजप  या रस्त्याची डागडुजी व्हावी अशी मागणी जूनच्या सुरुवातीला ग्रा. नसरापूर चे विद्यमान सदस्य संपत हडप यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्याकडे केली होती. त्या मागणीला यश येऊन रस्त्याची डागडुजी चे काम झाल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

         कर्जत तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेला रस्ता अशी ओळख असलेल्या कडाव - गणेगाव - चिंचवली - कळंबोली - अंजप या रस्त्याची आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी सतत मागणी केली जात आहे पण कोणालाही आजतागायत या रस्त्याची साधी डागडुजी करावी असे वाटले नाही. शिवसेनेचे आमदार असताना देवेंद्र साटम यांच्या कार्यकाळात ह्या रस्त्याला त्याचे वैभव मिळाले होते . अनेक फार्म हाऊस असलेल्या या भागाचे वेगळे महत्व आहे परंतु रखडलेल्या ह्या रस्त्याने अनेकांना आपले मत बदलावे लागले आहे. अनेक लोकांनी मतदानावर बहिष्कार करण्याचा देखील निर्णय ह्या रस्त्यासाठी घेतला होता . कोणत्याही प्रकारे ह्या रस्त्यावरून वाहन चालवणे आता जीवावर बेतले ह्या म्हणीशी संदर्भ साधित होते. गरोदर स्त्रियांना आयत्या वेळेला ह्या रस्त्यावर वाहतूक व्यवस्था नसल्याने व ह्या खराब रस्त्यांमुळे दवाखान्यात नेणे म्हणजे त्यांच्या जीवाला धोका पोचविण्या सारखे झाले होते. हीच गोष्ट लक्षात घेत ह्या रस्त्यासाठी कमीतकमी डागडुजी करून द्यावी अशी मागणी ग्रु.ग्राम. नसरापुर चे सदस्य संपत हडप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि कर्जत चे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडे १ जूनला केले होते. त्यानुसार दि. ६ जुलै रोजी खडी टाकत सदर रस्त्याचे डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आमदार यांचे आभार मानण्यात आले. आणि लवकरात लवकर हा रस्ता डांबरीकरण करून पूर्ण होईल अशी अपेक्षा केली .

अनेक वर्षांपासून रखडलेल्या ह्या रस्त्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसून आला नाही. त्यामुळे खराब झालेल्या ह्या रस्त्याचे कमीतकमी डागडुजीचे काम व्हावे असे मागणी करणारे निवेदन मी आमदार महेंद्र थोरवे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना दिले होते व रस्त्याच्या दुरुस्तीसंबंधी विनंती केली होती , ही मागणी लक्षात घेत रस्त्याची डागडुजी केल्याने प्रशासनाचे मी आभार मानतो . 

संपत हडप (ग्रा. नसरापूर सदस्य)

No comments:

Post a Comment