आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतला पुरस्थितीचा आढावा - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, July 22, 2021

आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतला पुरस्थितीचा आढावा

 आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन घेतला पुरस्थितीचा आढावा

       ज्ञानेश्वर बागडे-कर्जत

कर्जत तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे कर्जत शहरातील आमराई, कोतवाल नगर ,नाना मास्तर नगर, मुद्रे इंदिरा नगर या भागांमध्ये घरामध्ये, दुकानात पाणी शिरल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच उमरोली ग्रामपंचायत मधील पाली आदिवासी वाडी येथे दरड कोसळली परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तरी सदर संपूर्ण परिस्थिती चा आढावा आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन घेतला.No comments:

Post a Comment