लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकराचा दुर्दैवी मृत्यू - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकराचा दुर्दैवी मृत्यू

 *

लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकराचा दुर्दैवी मृत्यू

भिमराव कांबळे -कोल्हापुर 

तुटून लोंबकळणाऱ्या महावितरणच्या तारेला स्पर्श होऊन गीता गौतम जाधव (वय३९) आणि मुलगा हर्षवर्धन (वय१४) यांचा जागीच मृत्यू. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना बाचणी ता. कागल येथे घडली.

     घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाचणी गावातील गीता जाधव या आपला मुलगा हर्षवर्धन सह गावच्या ओढ्यात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धुवून त्या परत येत असताना तुटून लोंबकळत असलेल्या विदयुत वाहिनीच्या तारेचा डोक्यावर असलेल्या पाटीला स्पर्श झाला. क्षणार्धात विजेचा धक्का बसून त्या जागीच गतप्राण झाल्या. पाठोपाठ मुलगा हर्षवर्धन याच्याही डोक्याला तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा ही  मृत्यू झाला. गौतम जाधव यांचा एकुलता एक मुलगा व पत्नीचा आकस्मिक दुदैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीया बरोबरच गावावर शोक कळा पसरली असून महावितरणच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment