Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 डिकसळ येथे शेकाप चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

                  नरेश कोळंबे-कर्जत

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७४ व्या  वर्धापनदिनानिमित्त कर्जत येथील डिकसळ येथे विभागीय कार्यालयात वर्धापन सोहळा साजरा करण्यात आला.  या प्रसंगी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार शेकापचे संस्थापक सदस्य  भाऊसाहेब राऊत यांचे पणतु रोहनजी राऊत यांची विशेष उपस्थिती होती. 

 दरवर्षी प्रमाणे यावर्षीही  शेकाप चा ७४ वा वर्धापन सोहळा नव्याने उभारण्यात आलेल्या डिकसळ येथील जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहनजी राऊत यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी  ज्येष्ठ नेते  विलास थोरवे, मध्यवर्ती कमेटी सदस्य  आकाश निर्मळ,  पुरोगामी युवक संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष  वैभव भगत यांची यावेळी भाषणे झाली. 

सदर कार्यक्रमात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय  गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी  विष्णु कालेकर, सुहास भगत,  नंदा पाटील, उक्रुळचे उपसरपंच  सदानंद थोरवे,  सुहास भगत, चिंचवली ग्रूप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. जोत्सना नितेश भगत,  राजन विरले,  रामदास शेलार, ग्रामपंचायत सदस्य  जयेंद्र कराळे, पुरोगामी युवक संघटनेचे सावेले पंचायत समिती गणाचे अध्यक्ष  महेश कोळंबे,  सुशील कालेकर, लाल ब्रिगेड संघटनेचे  चरणदास भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते  कृष्णाजी भगत,  सुधीर कांबळे, विजय बोराडे, मनिष ठाणगे या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य शेकाप प्रेमी आणि हितचिंतक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies