Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अखेर माथेरानमध्ये गॅस टाकी वजन करून मिळणार!

 अखेर माथेरानमध्ये गॅस टाकी वजन करून मिळणार!

मनसेच्या मागणीला यश

चंद्रकांत सुतार-माथेरान

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीचा भडका उडाला आहे. सिलिंडरच्या गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, जानेवारीपासून सिलिंडर माथेरानमध्ये 195 रुपयांनी महाग झाला.घरगुती गॅसच्या किंमती दर महिन्यात वाढवून सरकारने त्यावरील अनुदान बंद केले आहे, त्यामुळे कोरोनाकाळात उत्पन्न घटले असताना सामान्यांना महागाईची मोठी झळ  पोहचत आहे, त्यातच पूर्वी घरगुती गॅस एका परिवार 4 माणसांना एक महिना पुरत असे परंतु तोच गॅस आता 20/ 25 दिवसात संपायला लागल्याने  नागरिकांना  टाकीतील गॅसबाबत संशय निर्माण झाला आहे एकीकडे लॉकडाउनचा फटका सर्वच नागरिकांना बसला आहे,त्यातच गॅस टाकीचे दर महिन्याला वाढ होत असल्याने जनता हतबल  आहे  नक्की कुठे कुठे आर्थिक घडी सांभाळायची हा मोठा प्रश्न गृहिणींना पडला आहे,  गॅस टाकी  कमी दिवसात संपत असल्याच्या भावना प्रत्येक नागरिक करत असल्याने अखेर गॅस टाकी वितरीत करताना वजन  करूनच द्यावी अशा प्रकारचे निवेदन मनसे माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, रवींद्र कदम, असिफ खान, भूषण सातपुते, संतोष केळगणे, या शिष्टमंडळाने नेरळ भारत गॅस सर्व्हिस यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे केली होती त्यास अखेर यश मिळाले जिथे विषय गंभीर तिथे मनसे खंबीर आज पासून माथेरान गैस वितरण दुकानात वजन काटा लावण्यात आला  व प्रत्येक गैस टाकी वजन करूनच ग्राहकाना देण्यात येत होती,त्यामुळे  मनसेच्या ह्या कार्या मुळे नागरीमध्ये समाधान व्यक्त होत आहे, प्रत्येक वेळी गॅस टाकी घेताना वजन करूनच घ्या असे आव्हाहन मनसेचे माथेरान शहर अध्यक्ष  संतोष कदम  यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies