Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सर्व धर्मिय पूरग्रस्तांच्या मदत कार्यात दाऊल उलुम इमाम अहमद ट्रस्टचा सर्वात मोठा सहभाग

सर्व धर्मिय पूरग्रस्तांच्या मदत कार्यात दाऊल उलुम इमाम अहमद ट्रस्टचा सर्वात मोठा सहभाग

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरत आहे जामिया इमाम अहमद रजा मदरसा

कुराण शिक्षणातून घडवले जात आहेत मौलवी प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली घेत आहेत विशेष मेहनत

ओंकार रेळेकर-चिपळूण


महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जामिया इमाम अहमद रजा मदरसा . कोंडीवरे तर्फे पूरग्रस्त लोकांना गृहउपयोगी वस्तूं,जेवण,आरोग्य सुविधा ,राहण्याची व्यवस्था या सह संपूर्ण मदत कार्यात उतरली असून हिंदू मुस्लिम असा भेदभाव न मानता सर्व धर्मीय बांधवांना मदत केली जात आहे. पुढे पूरपरिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत हे मदतकार्य सुरूच राहणार असल्याचे सांगून आज पर्यंत महाड, खेड,चिपळूण येथील पूरग्रस्त भागात मोठी मदत पोहचविण्यात आली आहे .अशी माहिती दारुल उलूम इमाम अहमद रजा शिक्षण संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट मुफ्ती इब्राहीम मगबुली यांनी प्रतिनिधी ओंकार रेळेकर यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत बोलतांना दिली.

         दाऊल उलुम इमाम अहमद रजा शैक्षणिक संस्थेच्या जामिया इमाम अहमद रजा.कोंडीवरे ता. संगमेश्वर या मदरशाने पुरग्रस्थाना केलेल्या मदत कार्यात संपूर्ण कोकणात आदर्श निर्माण केला आहे. या मदरशामधून सर्व समाजातील पूरग्रस्त बांधवांना त्यांच्या आवडी- निवडी नुसार संपूर्ण  गृहउपयोगी वस्तू मोफत दिल्या जात असून पूरग्रस्तांना आज पर्यंत मिळालेल्या मदतीपेक्षा सर्वात मोठी मदत असल्याचे मानले जात आहे.या करिता व्हाईस प्रेसिडेंट प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली यांच्या पुढाकाराने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.मदतीच्या वस्तूंचा येथे खास स्टॉल उभारण्यात आला आहे.

         २२ जुलै रोजी कोकणात आलेल्या महाप्रलंयकारी पावसात चिपळूण, खेड,महाड येथील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले यात जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली.अनेक संसार उध्वस्त झाले 


तर व्यवसायाच्या नुकसानी मुळे उत्पन्नाची साधने बंद झाली. या कठीण काळात विविध राजकीय पक्ष,संघटना,संस्था पूरग्रस्त लोकांच्या मदतीला धावून आल्या अनेकांनी अन्न धान्य ,भांडी,कपडे,जीवन आवश्यक साधने यांचे वाटप केले परंतु या सर्व मदत कार्यापेक्षा दाऊल उलुम इमाम अहमद रजा शैक्षणिक संस्थेच्या जामिया इमाम अहमद रजा.कोंडीवरे ता. संगमेश्वर या मदरशाने पुरग्रस्थाना केलेली मदत आणि याचे उत्कृष्ट नियोजन आज संपूर्ण कोकणात एकच कौतुकाचा विषय ठरत आहे. प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली हे स्वतः या संपूर्ण कार्यात दिवसभर लक्ष ठेऊन गरजवंत पूरग्रस्त बांधवांपर्यंत वेळेतच मदत पोहचविणे हा एकमेव उद्दिष्ट समोर ठेऊन नियोजनबद्ध  मदत कार्य करीत आहेत.

हाड,खेड,चिपळूण ,उकताड,मापारी मोहल्ला,गोवळकोट, शंकरवाडी मुरादपुर,माखजन, माटवण ,राजवाडी,डिंगणी,नायशी  आदी ठिकाणी पूरग्रस्त 

जरूरतमंद लोकांना जेवण आणि गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.शिवाय या सोबत आरोग्य  शिबिरही आयोजित करण्यात येत आहेत या करिता खास नागपूर येथून डॉक्टरांची टीम आली होती.शिवाय राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

कुराण शिक्षणातून घडविले जात आहेत मौलवी.

दारुल उलुम इमाम अहमद रजा संस्थेच्या जामिया इमाम अहमद रजा मदरशात मौलवीचे शिक्षण घेऊन  संपूर्ण जगभरातील असंख्य देशांमध्ये मौलवी मुस्लिम धर्म आणि धर्माचे विचार जगभरात पोहचविण्याचे उत्कृष्ट काम करीत आहेत. येथे शिक्षण घेऊन श्रीलंका,बांगलादेश,दुबई,
अबुदाबी,अमेरिका,इंग्लंड फ्रांस,जपान, रशिया,आफ्रीका, सौदी,दोहा,कतार,कॅनडा,मस्कत,या सह जगभरातील शेकडो देशामध्ये मागील ३० वर्षाच्या कालखंडात मौलवी काम करीत आहेत.या शैक्षणिक कार्यासाठी देशातील आणि  संपूर्ण जगभरातील मुस्लिम समाजातील
बांधव ईदच्या दिवशी जकातच्या माध्यमातून आर्थिक आणि आवश्यक सहकार्य करतात अशी माहिती प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली यांनी आमच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी घेतलेल्या खास मुलाखतीत बोलतांना दिली.जीवनात नियमित कुटुंबात वापरल्या जाणाऱ्या गृहउपयोगी वस्तू सह कपडे,भांडी,साबण,
साखर,चहापावडर,पीठ,माचीस,बादली, कुकर,मिक्सर,गॅस शेगडी,छत्री,चटई,महिलांचे  कपडे,लहान मुलांचे कपडे, वॉशिंग मशीन,सोंदर्य प्रसाधने,टॉवेल, रुमाल,
कडधान्य,चादर आदी वस्तूंचा समावेश आहे. मदरशाच्या माध्यमातून आज पर्यंत लाखो रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या आहेत. ही सेवा अविरत चालू असून आता  मदरशाच्या माध्यमातून मदत केंद्र उभारण्यात आले आहे पूरग्रस्तांना जी आवश्यक वस्तू आहे ती निवडून घेवून जाता येते. या साठी कूपन पद्धती राबवली जाते. हे मदत केंद्र पूरग्रस्त पुर्वपदावर येई पर्यंत आणि पुढील १५ दिवस कार्यरत राहणार आहे अशी माहिती प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली यांनी दिली.मदरशाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना  करण्यात येत असलेल्या  मदती बाबत संपूर्ण कोकणातून कौतुक होत आहे.कुटुंबाची पूर्ण खात्री करून कुपन देण्यात येतात. ज्यांना कुपन मिळाले आहेत ते पूरग्रस्त मदरसामध्ये येऊन हवी ती वस्तू घेऊन जातात. अत्यावश्यक वस्तू पूरग्रस्तांसाठी देण्यासाठी ठेवण्यात आली आहे. पूरग्रस्तांना मद्रसापर्यंत आणण्याची आणि परत त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची मोफत व्यवस्थाही मदरसा व्यवस्थापनाने केली आहे. हा रिलीफ कॅम्प दिवसभर  खुला ठेवण्यात आला आहे. 
मदरशा मधून कुराणचे  ईस्लाम धार्मिक शिक्षण दिले जाते येथे शिक्षण घेणारी मुले मौलवी म्हणून 
भारतात तसेच जगभर ईस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे सेवा कार्य करीत आहेत,मुस्लिम धर्मावर प्रेम करणारे जगभरातील मुस्लिम बांधव आणि दानशूर व्यक्ती येथे जकात स्वरूपात मदत करतात यातून मदरशामध्ये शिक्षणाचे महान कार्य घडते सध्या सुरू असलेल्या पुरग्रस्थाना मदत कार्यात मुंबई, पुणे,
नाशिक,कुर्ला,या सह महाराष्ट्रातील काना- कोपऱ्यातून मदत आली आहे.कुर्ला मुबई येथील मुस्लिम तरुणांनी स्वतः आपल्या कमाईच्या पैशातून पैसे जमा करून गुरुवारी येथे जिवन आवश्यक वस्तू आणल्या

प्राचार्य मुफ्ती इब्राहिम मकबुली यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मौलाना मुसा काझीम, अब्दुल रहीम मकबुली, अन्वर कासम खान,मुसा काझी,सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेखासन ,अब्दुल बशीर पटेल,काझीम आदि मान्यवर सर्व मदत कार्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies