पन्हाळा - मसाई पठारावरून चारचाकी दरीत कोसळली; एक ठार
भिमराव कांबळे -कोल्हापुर
पन्हाळा - घटनास्थळावरून मिळलेल्या माहीती नुसार इचलकरंजीतील तीन तरूण आखाडी साजरी करण्यासाठी मसाई पठारावर गेले होते. पठाराच्या वेखंडवाडीकडील बाजूस चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून पुष्पक लिगडे असे मृत तरूणाचे नाव आहे. तर गाडीतील अमित गुप्ता आणि निखील शिंगे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेवून, जखमींना दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याची घटनास्थळी चर्चा होती.