वाढदिवसाला घेतली 500 झाडे दत्तक- अनिष काळभोर
प्रियांका ढम -पुणे
ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ अनिष काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 2000 लिटर पाण्याची टाकी व 21000 हजार चा चेक ग्रीन फाऊंडेशन च्या कार्या साठि देण्यात आला .रविवारी हवेली तालुक्यात लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथे 500 जंगली शिशु,खैर,कडूनिंब, करंज,चिंच अशा प्रकारची रोपे लावण्यात आली.
यावेळी ग्रीन फाउंडेशन, शिवशाही प्रतिष्ठान, लोणी स्पोर्ट्स क्लब,महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवेली, गिरीश विभा ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था, धनगर समाज सेवा संस्था, नेहरू युवा केंद्र, लोणी काळभोर ग्रामस्थ, वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. कोळपे वस्ती , वनविभाग परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात तरुणांनी सहभाग घेतला होता. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या तरुणांनी केला. भारतातील सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे भारतात दररोज येणाऱ्या करोडो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर काही दिवसांतच ही वृक्ष नष्ट होत होती वा त्यांची वाढ न झाल्याने वृक्ष लागवड करूनही फायदा होत नव्हता.
यात ग्रीन फाऊंडेशन ने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारीही निश्चित केली आहे. त्यामुळे वृक्षांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. वाढदिवसानिमित्त ग्रीन फाऊंडेशन, वनविभाग लोणी काळभोर यांच्या वतीने शिशु-150 रोपे, खैर-100 रोपे,कडुलिंब-100 रोपे,करंज 50रोपे,चिंच-100 रोपे एकुन - 500 झाडे लावुण वाढदिवस साजरा केला. यावेळी मंगेश सपकाळे वनपाल (लोणी काळभोर ),उद्योजक अनिषशेठ काळभोर,वनरक्षक जागृती सातरकर, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर , वनरक्षक वाईकर साहेब,पंचायत समिती सदस्य सनिशेठ काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, शिवशाही अध्यक्ष प्रमोद भाऊ काळभोर, उद्योजक अमित भाऊ काळभोर ,सचिनशेठ झेंडे , दत्तात्रय शेंडगे, भाऊसाहेब कोळपे, आबासाहेब माने, पप्पूशेठ बंडागळे, प्रियांका बोंगाळे नेहरू युवा केंद्र हवेली तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक,ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जालिंदर पवार, किरण भोसले उपस्थित होते.