डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
प्रियांका ढम-मुंबई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर २९ जणांकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. तसेच बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली असून, या घटनेने डोंबिवली ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना ताब्यात घेतले असून, आणखी सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.