Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड प्रीमिअर लिग, क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न.

 रायगड प्रीमिअर लिग, क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचे ऑक्शन उत्साहात संपन्न.

अमूलकुमार जैन-अलिबाग


 रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या २५ वर्षा खालील खेळांडूनसाठी २०-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटी मार्फत करण्यात येणार आहे,रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणारी हि क्रिकेट स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खेळांडूनसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून मानली जाते.

रायगड प्रीमिअर लिग हि नोंदणीकृत संस्था असून, स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचे लिलाव (ऑक्शन) आज पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्ट मध्ये  उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली.एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून रायगड जिल्ह्यातील सुमारे चारशे खेळाडूंनी ह्या स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपापला सहभाग नोंदवला होता. सदरच्या खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघांचे संघ मालक आभासी पॉईंट्स प्रकाराने आपापल्या संघात दाखल करून घेतले आहेत. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचे ऑक्शन द्वारे पथक तयार करण्यात आले.

ज्या खेळाडूंनचे लिलाव (ऑक्शन) झालेले नाही अश्या सर्व खेळाडूंना ज्ञाय देण्यासाठी आयोजकांनी अश्या खेळांडूनसाठी सुद्धा सामन्याचे नियोजन केलेलं आहे.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १६ खेळाडूंना पुन्हा आरपीएल स्पर्धेत आठ संघांनमध्ये स्थान देण्यात येईल.

कोविड काळात खंडित झालेल्या क्रिकेट खेळाकडे आता युवा खेळाडूंचे लक्ष लागले असतांना रायगड प्रीमिअर लिग सारख्या स्पर्धेमुळे त्यांना पुन्हा एकदा आपल्या कलागुणांना वाव मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना रायगड जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत, १) रायगड वॉरियर्स, संघमालक-आदित्य दर्गे,देवेंद्र चवरे २) द्रोणागिरी मास्टरर्स, संघमालक- फ्रेंड्स क्लब ३) सुधागड रायडर्स, संघमालक - आवेश चीचकर ४) सह्याद्री चॅम्पियन्स, संघमालक- रतन खारोल आणि दिपक ठक्कर ५) जंजिरा चायलेंजर्स,संघमालक- सचिन राऊळ ६) कुलाबा स्ट्राईकर्स, संघमालक - संदेश गुंजाळ आणि अभिजित तुळपुळे  ७) खांदेरी-उंदेरी किंगस,संघमालक-कुमार बासरे ८) उमरखिंड फायटर्स, संघमालक-अँड.आलिंम शेख, विजय खानावकर आणि प्रदिप स्पोर्ट्स.

अशा आठ संघांचा समावेश स्पर्धेत असेल. संपूर्ण आरपीएल स्पर्धा हि रायगड जिल्ह्यातील टर्फ पीच असलेल्या मैदानावर खेळवण्यात येईल. आज झालेल्या खेळाडूंच्या लिलाव (ऑक्शन) प्रक्रियेच्या रंगारंग कार्यक्रमासाठी सिडकोच्या एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल,प्रभाकर घरत उपमहाव्यवस्थापक ओनजीसी, सिडको युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव जे.टी पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील,सुप्रसिद्ध उद्योजक मार्फी क्रीयाडो,लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, विजय खानावकर नगरसेवक पनवेल, युवा नेते अँड.विक्रांत घरत, रायगड प्रीमिअर लिगचें अध्यक्ष राजेश पाटील,सचिव जयंत नाईक,उपाध्यक्ष आनंद घरत,डॉ.राजाराम हुलवान,खजिनदार कौस्थुभ जोशी,प्रदिप खलाटे,सुबोध दरणे,जितेंद्र नाईक, अँड.पंकज पंडित,शंकर दळवी,संदिप जोशी,अमोल येरणकर,सह रायगड जिल्यातील नामवंत खेळाडू,क्रिकेट प्रेमी लोकं उपस्थित होते.आजच्या उत्कंठावर्धक रंगारंग कार्यक्रमाचं तमाम क्रिकेटप्रेमींनी कौतुक केली असुन होणाऱ्या प्रत्यक्ष स्पर्धेची रायगडवासीयांना उत्सुकता लागुन राहीली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies