Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महाविकास आघाडी सरकारसाठी केलेली तडजोड आहे - माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे वक्तव्य

 महाविकास आघाडी सरकारसाठी केलेली तडजोड आहे - माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे वक्तव्य

माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर यांचा २४ गावातील कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

 अमोल चांदोरकर -श्रीवर्धन


महाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते? त्यामुळे शिवसैनिकांनी सज्ज व्हा सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार आज या हरिहरेश्वर भूमीतून हे रणशिंग फुंकल गेलं असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं. माजी जिल्हापरिषद सदस्य अविनाश कोळंबेकर यांच्या जाहीर प्रवेश माजी खा. अनंत गीते यांच्या उपस्थितीत झाला यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ,  आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अनिल नवगणे  आमदार महेंद्र थोरवे,तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, प्रमोद घोसाळकर, श्यामकांत भोकरे, सुकुमार तोंडलेकर, शहर प्रमुख राजू चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. 


 यावेळी बोलताना अविनाश कोळंबेकर यांचा प्रवेश नाही घर वापसी आहे. पाटाच पाणी पाटालाच जाणार सर्व पितरांच्या उपस्थीत त्याचा प्रवेश झाला आहे. यावेळी आधीच्या वक्त्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा एकच सूर आहे त्यामुळे मी पण त्या सुरात सहभागी होऊन सांगतो सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार श्रीवर्धन मतदार संघात आलेली मरगळ ही मरगळ घालवण्यासाठी शिवसैनिकाला गरुड झेप घेण्यासाठी दोन पंख आणलेत महेंद्र थोरवे व महेंद्र दळवी हे आपल्याला बळ देणार आहेत. आता श्रीवर्धनची शिवसेना एकाकी नाही पूर्ण रायगडची शिवसेना श्रीवर्धनच्या पाठीशी आहे.  राज्यात आपलं सरकार आहे आपलं कशासाठी तर मुख्यमंत्री आपले आहेत. सरकार आघाडी सांभाळेल आपली जबाबदारी आपल गाव सांभाळायची आहे. गाव सांभाळताना फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. आमचा एकच नेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचा दुसरा गुरू नाही बाकी किती कोण कोणाला जाणता राजा म्हणत असुदे आमचा दुसरा नेता होऊ शकत नाही. सत्तेसाठी तडजोड केलेली आहे. आघाडी ज्या दिवशी तुटेल तेव्हा तुटेल माझा श्राप नाही आघाडी तुटुदे पण जेव्हा आघाडी तुटेल तेव्हा आपण आपल्याच घरी जाणार शिवसेनेतच जाणार असे सूचक वक्तव्य यावेळी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केले. तटकरेनी लक्षात ठेवावं तुमच्यासाठी मैदान कधीच मोकळं होणार नाही. त्यांनी सातबाऱ्यावर अतिक्रमण केलं आहे. त्यांचं  अतिक्रमण उतरवायचे आहे. तुम्ही साथ द्या श्रीवर्धनचा आमदार मी आणून दाखवेन अशी भावनिक हाक यावेळी माजी खा. अनंत गीते यांनी दिली. श्रीवर्धन मतदार संघ कोणालाही आंदण दिलेलं नाही असे वक्तव्य माजी खा अनंत गीते यांनी केले. 

पालकमंत्री सुडबुद्धीने वागतात-आमदार महेंद्र थोरवे

आमदार महेंद्र थोरवे -  अविनाशजी आपण शिवसैनिक होतात पण रायगडला लागलेला शाप आहे इथे भुलभुलैय्या करणाऱ्याची कमी नाही. पालकमंत्री सूडबुद्धीने वागत आहेत शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. त्याच अतिशय दुःख होत आहे. याची दखल घेतली जाईल मी पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याजवळ ही खंत मांडली आहे. आघाडीचा धर्म कुठेही पाळत नाहीत. ही आघाडी आम्हाला मान्य नाही शिवसेना स्वबळावर लढली पाहिजे कर्जत खालापूर मतदार संघ स्वबळावर लढणार प्रत्येक तालुक्यातील शिवसैनिकानी याची दखल घेतली पाहिजे जिल्ह्याच्या मतदार संघाला केंद्र बिंदू श्रीवर्धन आहे शिवसेनेच्या बांधणीला सुरवात श्रीवर्धन मधून करायची आहे. आश्या लोकांबरोबर युती करायला लावू नका जी भ्रष्टाचार ने बरबटलेली आहेत.

आ. महेंद्र दळवी - अविनाश कोळंबेकर यांचा पक्ष प्रवेश हा जिल्ह्याला दिशा दर्शक पक्ष प्रवेश असेल. मला नऊ वर्षाचा गाडा अनुभव आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे असे आरोप होतात किती आरोप होतात मात्र पुढे त्याच काही निर्णय होत नाही कालच आपण हसन मुश्रीफ यांचं नाट्य पाहिलं पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांच शेवट पर्यंत पोहचण्याची गरज आहे. रायगड जिल्हापरिषद वर भगवा फडकणार आणि ही शिवसेनेच्या अस्तित्वाची शेवटची लढाई असल्याचं वक्तव्य दळवी यांनी केल. 


अविनाश कोळंबेकर - साडेतीन वर्ष राष्ट्रवादीचे काम केलं त्याच काय फळ हातात आलं? राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा अविनाश तूच फक्त मंचावर अस सांगण्यात आलं पण याठिकाणी सर्वाना मंचावर घेतलं गेलं. राष्ट्रवादीत साडे तीन वर्षात दिलेल्या कामच एकही प्रस्थाव मंजूर केला नाही प्रशासकीय मान्यता आणायला सुतारवाडीला आणायला जावं लागतं वर्क ऑर्डरचा मात्र पत्ता नाही. अशी परिस्थिती राष्ट्रवादीत आहे तालुका अध्यक्ष बोलतो अविनाश कोळंबेकरला गावात घेऊ नका मी सांगितलं द्या त्याच्या कानशिलात लावून पुढचं बघून घेऊ लोकांना घाबरवण्याचं काम करतो पण शिवसैनिक घाबरत नाही. जावेळचा पूल पडलेला आहे. तालुका अध्यक्ष सांगतो आमच्या पायाला हात लावत नाही तो पर्यंत काम करणार नाही. तालुका अध्यक्ष १२ नंतर रात्री गावात फिरतो.  आसा लोकनेता होऊ शकत नाही. १० वर्ष काम करतोय पण एक शब्द बोलता येत नाही. असे म्हणत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांचेवर घणाघात केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies