रिपब्लीकन सेनेचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा कोल्हापूरात संपन्न
महाराष्ट्र मिरर टीम-कोल्हापूर
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणून पच्छिम महाराष्ट्राच्या पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक कोल्हापूर शहरातील हाँटेल वुडलँड मध्ये आयोजित करण्यात आली होती. उदघाटन राज्याचे कार्यकारणी सदस्य तथा हिंगोली जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय देखने होते तर प्रास्ताविक आयोजक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भिमराव कांबळे यांनी केले.सदर कार्यक्रमास कोल्हापूर भानुदास भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष,दिपक जगताप ,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रभाकर गायकवाड,नांदेड युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत गोडबोले,,सहरिपब्लीकन सेनेचे कोल्हापुर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन स्वप्नील वाकृषे यांनी केले तर आभार जिल्हा सचिव हरी कांबळे यांनी मानले.दिवंगत माजी जिल्हाध्यक्ष सखाराम बापु कामत यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली.