कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली झाली, त्याच्या जागी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे हाती घेतली, नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या समवेत केतन जोशी, कर्जत नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे उपस्थित होते.
नगरपालिका हद्दीतील काही कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपालिकेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले, नगरपालिकेच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच कर्जत नगरपालिका क्षेत्रात 100 टक्के लसीकरण व्हावे या दृष्टीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण शिबीर सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध व्हावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि कर्जतसाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देणार आहेत असे नगराध्यक्ष जोशी यांनी सांगितल.