Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी रिलीफ फौंडेशन : सिकंदर जसनाईक

सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी रिलीफ फौंडेशन : सिकंदर जसनाईक

पूरग्रस्तांसाठी देवदूत म्हणून धावून आलेल्यांना कौतुकाची थाप देत रिलीफ फौंडेशनने केला सन्मान

ओंकार रेळेकर-चिपळूण


सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठराविक मर्यादा न ठेवता रिलीफ फौंडेशन जेव्हा काम करते तेव्हा  समोरच्या व्यक्तीची जात,पात धर्म हे न विचारता ज्या सहकार्यतेच्या भावनेतून काम करीत आहोत ते प्रामाणिक काम आहे, भविष्यात या हुन अधिक जोमाने फौंडेशनच्या  माध्यमातून सेवाकार्य होईल असा विश्वास    व्यक्त करून सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी रिलीफ फौंडेशन सदैव आहे असे सिकंदर जसनाईक आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले.


२२ जुलै रोजी चिपळूण मध्ये आलेल्या महाप्रलंयकारी पुरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.अशा वेळी लोकांच्या मदतीला परमेश्वररूपी हात पुढे आले.या प्रसंगात कोणी पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचवले तर कोणी अन्नधान्य वाटप ,कपडे ,भांडी वाटप केले तर कोणी रोख स्वरूपात आर्थिक मदत केली अशा दानशूर आणि सेवाभावी वृत्तीच्या लोकांचा गौरव सोहळा रिलीफ फौंडेशन खेड यांच्या वतीने चिपळूण मधील वालोपे येथील हॉटेल रिमझ येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता या सत्कार सोहळ्यात रिलीफ फौंडेशनचे अध्यक्ष सिकंदर जसनाईक बोलत होते. 

महापुरातलोकांसाठी देवदूत म्हणून धावून आलेल्या नागरिकांचा आज सन्मान करून रिलीफ फाउंडेशन ने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे रिलीफ फाऊंडेशनचे काम अल्लाताला कडे नोंद झाले असे  गौरौउदगार काढून जिथे जिथे मदतगार नसेल तिथे अल्लाहताला मदतिला असेल रिलीफ फौंडेशन च्या माध्यमातून कतार येथील उद्योजक अजिम धनसे ,सिकंदर जसनाईक,खालिद चोगले,हनिफ घनसार मदतकार्यातून परमेश्वराचा आशीर्वाद मिळवत आहेत त्यांनी आज येथे केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराच्या दूतांचाच केलेला सत्कार आहे असे प्रतिपादन सुबाई जमियत अहले हदीस चे अध्यक्ष शेख अब्दूलस्लाम सलकी यांनी केले.

     चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम, रिलीफ फाउंडेशनचे प्रमुख खेडचे माजी सभापती सिकंदर जसनाईक ,चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक शशिकांत मोदी, रामदास राणे, नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेविका रिहाना बिजले,अनपूर मदरसा सिंधुदुर्ग चे नाझीम मुकादम,मौलाना अब्दुल सलाम,मकसूद सैन्,मौलाना उमर ,यासिन दळवी,रामदास राणे ,जमी जमातचे आरिफ मुल्लाजी, दाऊद कादिरी, अता उल्ला तिसेकर.चिपळूण तालुका मुस्लिम समाज अध्यक्ष सलीम कास्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. महापुरात लोकांचे प्राण वाचवणार्‍या आणि सर्व प्रकारचे मदत कार्य करणाऱ्या चिपळुणातील सुमारे साठहुन अधिक विविध संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि व्यक्तिगत स्वरूपात सर्व मंडळींचा  सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेल्या मुरादपुर येथील महाराष्ट्र हायस्कूल करिता रिलीफ फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपये  मदत देण्यात आली, तसेच संगमेश्वर तालुक्यातील बोट कुटुंबातील तीन अंध सख्ख्या भावांना २५००० आर्थिक सहकार्य,संगमेश्वर तालुक्यातील काही मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सर्व धर्मीय पूरग्रस्त बांधवांच्या मदत कार्यात रिलीफ फाउंडेशन खेडची मदत ठरत आहे लक्षवेधी ठरली होती कतार येथील तरुण उद्योजक आजिम धनसे आपल्या कोकणभूमी करीता मेहनत घेत आहेत.गरजवंतांना थेट मदत मिळत असल्याने आजिम धनसे,सिकंदर जसनाईक,खालिद चोगले,हनिफ घनसार बजावत आहेत देवदूताची भूमिका पार पाडत आहेत.आखाती देशातील कतार येथील तरूण उद्योजक तथा खेड तालुक्यातील भोसते गावचे सुपुत्र आजिम धनसे आणि मित्रमंडळ यांच्या विशेष पुढाकाराने खेड रिलीफ फाउंडेशनने महापुराच्या संकट काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सर्व धर्मीय पूरग्रस्त बांधवांच्या मदत कार्यात रिलीफ फाउंडेशन खेड ची मदत  लक्षवेधी ठरत आहे.कोरोना संकटकाळ आणि महापुरात मदतकार्य करून आजिम धनसे यांनी आपल्या जन्मभूमी वरील प्रेम व्यक्त करीत खेड,चिपळूण, महाड मधील पूरग्रस्त व्यापारी आणि नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या मदतीसोबतच रोख आर्थिक मदत करीत लोकांसाठी देवदूत बनून धावून आले आहेत.खेड चे माजी सभापती सिकंदर जसनाईक,सामाजिक कार्यकर्ते खालिद चोगले,हनिफ घनसार यांचे या कामी विशेष सहकार्य असून धनसे हे जसनाईक यांचे भाचे आहेत त्यांच्या आग्रहाने मदकार्याचे नियोजनबद्ध वाटप सुरू आहे.

 फक्त महापुरच नव्हे तर रिलीफ फौंडेशनचे संकटकाळात तसेच सामाजिक कार्यात फार मोठे योगदान आहे कोरोना संक्रमण काळातही मुकादम हायस्कूल  येथे कोविड संदर्भात प्राथमिक स्तरावर उपाययोजना म्हणून आरोग्य केंद्र  उभारण्यात आले होते यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेत होती यावेळी सुमारे अडीच हजारहुन अधिक पीपीई किट चे वाटप करण्यात आले होते या करिता लाखो रुपयांचा खर्च रिलीफ फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आला होता तसेच अपंग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या समाजातील घटकांना रिलीफ फाउंडेशनचे नेहमी मदत कार्य असते अपंग व्यक्तींना व्हीलचेअर तसेच मुलांना शैक्षणिक कार्यातही  मोठा मदतीचा हात असतो यामध्ये अनेक मुलांना लॅपटॉप ,  कपडे वाटप हा उपक्रमही मोठ्या प्रमाणात सुरू असतो निसर्ग चक्रीवादळ असो वा टोक्ते वादळ या वादळामध्ये आणि अनेक गरीब व रोजगार  नसलेल्या लोकांची घरे कोसळली या संकट काळातही रीलीफ फाउंडेशनने नुकसानग्रस्त नागरिकांना मोठा मदतीचा हात दिला. कोणाला घराच्या भिंती बांधायला मदत तर कोणाला सिमेंट पत्रे वाटप करण्यात आले होते.कोरोना काळातही अनेकांचा रोजगार गेला होता अशा वेळी गरजवंत कुटुंबाना अन्नधान्य वाटप खाद्यपदार्थ वाटप असा उपक्रम राबविण्यात आला होता,शिवाय खेड पोलीसांच्या मागणीवरूनही पोलिसांच्या वतीने मदतीचे वाटप करण्यात आले होतें. अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील अनेक मुलीच्या संपूर्ण लग्नाचा खर्च रिलीफ फौंडेशनने केला आहे. पूरग्रस्त असणाऱ्या ज्या गरजवंत मुलांना नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात जायचे आहे  अशा गरजवंतांचा पासपोर्ट पुरात संपूर्ण खराब झाला असल्यास अशांना नवीन पासपोर्ट काढणे कामी सर्वोतोपरी मदत रिलीफ फौंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे.अनेक गावांत पाखाड्या आणि  बोअरवेल स्वखर्चाने फाउंडेशनतर्फे देण्यात आले आहे.हजावाणी फौंडेशन खेड,कोंडीवरे मदरसाचे मोमीन काझी, युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ,आरोग्य सभापती शशिकांत मोदी,लायन्स क्लब चिपळूण,रोशनी एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट चे मुनावर पठाण ,ईदरा दाऊत कुराण वा सुनाह चे यासीन दळवी आरोग्य निरीक्षक  महेश जाधव,रंजिता फौंडेशन रंजिता ओतरी,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार,पत्रकार रमजान गोलंदाज, कोकणी डॉक्टर असोशियशन,जामा मशीद मुंबई, अलवी फाउंडेशन , कोकण मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन , गोळकोट वेल्फेअर असोसिएशनचे जफर कटमाले, मदरसा दारुल कुरान चे अखलाख मयर यांसह सुमारे साठहुन अधिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.आम्ही असेच काम करत राहू,असे सत्कारमूर्ती मंडळींनी  सांगितले.माजी सभापती शौकत मुकादम,नगरसेवक शशिकांत मोदी,रामदास राणे,यासिन दळवी,सलीम कास्कर डॉ.शमीना परकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाज बांधव आणि रिलीफ फौंडेशन चे विशेष कौतुक करून कार्यक्रमाच्या सुरवातीला आयोजकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्या बद्दल रऊफ खतीब यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.संकट काळात मदतकार्य करण्यासाठी या मंडळींना प्रोत्साहन मिळावे अन्य बांधवांनी बोध घ्यावा यांच्या प्रेरणेतून मदतकार्यात पुढे यावे या भावनेतून आम्ही हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे असे हनिफ घनसार यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies