सर्व प्रसंगी मदतकार्यात देवदूत ठरलेल्या आदर्श सेवाभावी संघटना जमीय जमात खेडचा रिलीफ फौंडेशनने केला विशेष सन्मान
कोरोना संक्रमण काळ, महापुराचे संकट वैद्यकीय,शैक्षणिक,आर्थिक मदतकार्यात मोठा सहभाग
ओंकार रेळेकर-चिपळूण
आपल्यातीलच एक भाऊ समजून मला हाक मारा जिथे,जिथे गरज लागेल तिथे मी हजर असेन असे आरीफभाई मुल्लाजी यांनी सत्कार स्वीकारल्या नंतर बोलतांना सांगितले.रिलीफ फौंडेशन खेड तर्फे नुकताच हॉटेल रीमज येथे आयोजित सेवाभावी संघटनाच्या सन्मान सोहळ्यात खेड मधील दुबई मधील प्रसिद्ध उद्योगपती तथा खेडचे सुपुत्र बशीरभाई हजवानी यांच्या अध्यक्षखाली स्थापन झालेल्या जमीय जमात खेड तालुका यांचा त्यांच्या पूरग्रसतांच्या पुनर्वसन अंतर्गत केलेल्या कामाची नोंद म्हणून विशेष गौरव करणेत आला या संघटनेने महापूर काळात खेड,चिपळूणयेथे पूरग्रस्त भागातील लोकांचे स्थलांतर, त्यांना एक आठवडाभर नाश्ता तसेंच दोन वेळचे जेवण हे प्राथमिकतेने दिले. पूरग्रस्त भागातील दुकान घर, शाळा यांचा सफाई करिता २० लोकाचे विशेष पथकाने सफाई कामात उल्लेखनीय कामगिरी केली.रोगराई पसरू नये या साठी फवारणी तसेंच वेद्यकीय तपासणी करून घेतली.या संस्थेने विविध सेवाभावी संगठनाच्या माध्यमातून पूरग्रत व्यापारी तसेच घर धारकांना रोख रक्कम, गृह उपयोगी साहित्य, धान्य,कपडे वाटप केले. काही घर पूर्ण उध्वस्त झाले त्यांचे रिपेरिंगची जवाबदारी सेवाभावी संस्थाच्या सहाय्यनी घेतली.या सर्व कामात बशीरभाई हजवानी याच्या मार्गदर्शना खाली संस्थेचे पदाधिकारी जलालभाई काद्री, अरिफभाई मुल्लाजी, अनस भाई पोत्रिक, दाऊदभाई(दादू भाई )काद्री रउफभाई खतीब, आताउल्लाह तिसेकर, सिराज भाई पटेल आणि इतर पदाधिकारी यांनी कमालीचे परिश्रम घेतले जमिय जमात खेड चे आरिफ मुल्लाजी याचे अनेक वर्षपासून सामजिक कार्य सुरू असून महापूर आणि कोरोना संकट काळात गरजर्वंतांनच्या घरोघरी थेट मदकार्य करून प्रत्येकाच्या कुटुंबातील एक घटक म्हणून मुल्लाजी यांनी वडीलधाऱ्यांची भूमिका बजावली आहे.कोरोना संक्रमण काळ असो किंवा चिपळूणमध्ये आलेला महापुर या काळात चिपळूण,खेड वासियांकरता आरिफ मुल्लाजी आणि जमिय जमात खेड सर्वधर्मसमभाव हे तत्व जपून मदत कार्यात उतरले होते ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया या पूर्वी विविध ठिकाणी त्यांचा झालेला सत्कार कार्यक्रमात अनेक मान्यवर मंडळींनी व्यक्त केली आहे.कोरोना संक्रमण काळ आणि आता चिपळूण मध्ये २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला कोकणातील अनेक समाज संघटना धावून आल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह गृहपयोगी वस्तू, औषधे आदी साहित्यांचे वाटप करून या सर्वांना दिलासा दिला आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला असताना मुल्लाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घरोघरी अन्नधान्य जीवनात वस्तू वाटण्याचे काम केले होते अनेकांच्या चुली विझल्या होत्या त्या पेटवण्याचे महान पुण्य त्यांनी केले स्वतःच्या घरात ढोपरभर चिखल पुराचे पाणी होते तरीही ते लोकांच्या मदतीसाठी उतरले महापूर आल्यानंतर अनेकांचे संसार वाहून गेले घरात अन्न पाणी शिल्लक नव्हते लोक पाण्यासाठी वणवण करीत होते या वेळी मुल्लाजी आणि जमिय जमात खेड चे पदाधिकारी यांनी चिपळूण खेड मध्ये तात्काळ पिण्याचे पाणी चहा नाष्टा ची व्यवस्था केली होती एवढेच नव्हे तर महाराष्ट्र हायस्कूल येथे आपल्या वीस सहकारी मित्रांना सोबत घेत खास खेड येथून मुल्लाजी चिपळूण ला पोहचले व स्वतः साफ सफाई करण्यासाठी उतरले या वेळी ते घरोघरी जात होते पिण्याचे पाणी आणि जेवणाचे साहित्य प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते करत होते कोण कुठल्या समाजाचा आहे पक्ष कोणता आपला मतदार आहे का याचा किंचितही विचार न करता महापुरात सरसकट मदत कार्य सुरू आहे .जमिय जमात खेड आणि आरीफभाई मुल्लाजी उत्कृष्ट सामाजिक दायित्व निभावत आहेत सर्व समाजाप्रती असलेली मानवतेचे भावना खऱ्या अर्थाने जपण्याचे काम ते करीत आहेत कोरोना संक्रमण काळ असो किंवा चिपळूणमध्ये आलेला महापुर या काळात चिपळूण वासियांकरता देवदूत बनून मदतकार्यात उतरले होते.आजही विविध माध्यमातून हे कार्य सुरू आहे.