रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट!
अमूलकुमार जैन-अलिबाग
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 27 व २८ सप्टेंबर याकाळात कोकण विभागातील काही जिल्ह्यात #अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने २८ सप्टेंबर रोजी किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात रायगड जिल्ह्याचा समावेश आहे.
नदीकाठच्या तसेच किनारपट्टीवरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. याकाळात मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.