Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माथेरानच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि मिनिट्रेनची सुरळीत सेवा देणार : शलभ गोयल

 माथेरानच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि मिनिट्रेनची सुरळीत सेवा देणार : शलभ गोयल

              चंद्रकांत सुतार-माथेरान

दिवाळी हंगाम लवकरच सुरू होणार असून सध्यातरी नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनिट्रेन सेवा बंदच आहे.निदान अमन लॉज ते माथेरान या तीन किलोमीटर अंतरासाठी शटल सेवा सुरू आहे त्यामुळे पर्यटकांना सोयीस्कर होत आहे अन्यथा माथेरानचे आगामी सर्वच हंगाम व्यर्थ गेले असते.

       माथेरान मिनिट्रेनला युनेस्को मध्ये स्थान मिळाल्यानंतर माथेरान नगरपालिका व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त आयोजनातून माथेरान मध्ये लवकरच १३ व १४ तारखेस माथेरान मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे ह्यातून पर्यटकांना माथेरानचे पर्यावरण , संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा मानस आहे ह्याकरिता आज रेल्वेचे व्यवस्थापक  (डी.आर.एम.)शलभ गोयल यांनी माथेरानला भेट दिली.यावेळी गोयल यांनी माथेरान रेल्वे स्टेशनच्या संपूर्ण भागाची पाहणी करून संबंधित अधिकारी कर्मचारी वर्गाला स्टेशन परिसरात पर्यटकांना कशाप्रकारे अद्ययावत सोयीसुविधा दिल्या जातील याबाबत सूचना केल्या.

समस्त माथेरानकर व प्रवाश्यांच्या वतीने माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी शलभ गोयल यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागण्या सादर केल्या. माथेरान रेल्वे स्टेशन लगतची ईमारत भग्नावस्थेत असल्याने विद्रुप दिसत आहे तसेच काही भाग मोडकळीस आला असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका असल्याने तातडीबे दुसरुस्ती व सुशोभित करण्यांत यावी.तसेच सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी सुध्दा याबाबतीत गोयल यांना निवेदन सादर केले आहे.

रेल्वे महाव्यवस्थापक मुंबई शलभ गोयल,गौरव झा,शलभ गोयल मंडल रेल प्रबंधक मुंबई,गौरव झा वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक,माथेरान पालिकेकडून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,माजी नगराध्यक्ष अजय सावंत,विवेक चौधरी,मनोज खेडकर, राजेश दळवी, तसेच माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे ,आरपीआयचे अध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies