प्रेस कौन्सिल ऑफ इंडियावर एनयुजेआयचे प्रसन्ना मोहंती व प्रज्ञानंद चौधरी यांची निवड
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
प्रसन्न मोहंतीनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स (इंडिया) च्या दोन सदस्यांना अनेक वर्षांनंतर भारतीय प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये नामांकित करण्यात आले आहे. NUJI चे सरचिटणीस श्री प्रसन्न मोहंती आणि संस्थेचे दोन वेळा अध्यक्ष श्री प्रज्ञानंद चौधरी यांना श्रमजिवी पत्रकार श्रेणीमध्ये सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. प्रज्ञानंद चौधरी यापूर्वीही प्रेस कौन्सिलचे सदस्य होते. श्री मोहंती हे ओरिसा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचे अध्यक्ष आणि श्री चौधरी हे पश्चिम बंगाल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्सचे अध्यक्ष आहेत.
एनयुजेआयचे (NUJI)अध्यक्ष रास बिहारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ अरविंद सिंह, एनयुजेआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रजत कुमार गुप्ता, सीमा किरण, प्रदीप तिवारी, भूपेन गोस्वामी, सय्यद जुनैद, पी राजू आणि रामचंद्र कनोजिया, एनयुजेआयचे राष्ट्रीय सचिव शीतल करदेकर, सीमा मोहन, पंकज सोनी, कमलकांत उपमन्यू, दीपक राय, के कंधास्वामी तथा प्रशांत चक्रवर्ती यानी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया तील एनयुजे इंडियाच्या सदस्यांच्या नामांकित आनंद व्यक्त केला. दिल्ली जर्नालिस्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष राकेश थपलियाल आणि सरचिटणीस केपी मलिक यांनी सांगितले की, श्री मोहंती आणि श्री चौधरी यांच्या नामांकनाने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियात पत्रकारांच्या हक्क आणि हितसंबंधांच्या लढाईला चालना मिळेल.