रायगड प्रीमियर लिग पंचवीस वर्षाखालील टी-२० क्रिकेट स्पर्धा नव्हेंबर महिन्यात होणार सुरू
अमूलकुमार जैन-अलिबाग
एकूण ४०० खेळाडूंनी ह्या स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला होता,त्यातून १२८ खेळाडूंना आठ संघांच्या संघमालकाने आभासी पॉईंट्स द्वारे लिलाव करून आपापल्या संघात दाखल करून घेतले. उर्वरित सर्व अनसोल्ड खेळाडूंना ह्या स्पर्धेत खेळता यावे म्हणून बाद पद्धतीच्या स्वरूपाची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एकूण १६ संघांचा ह्यामध्ये समावेश आहे.ह्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १६ खेळाडूंना थेट आरपीएल स्पर्धेत वाइल्डकार्ड इन्ट्री मिळणार आहे.आज ह्या स्पर्धेची सुरुवात खारघर पनवेल येथील घरत क्रिकेट मैदानावर करण्यात आली त्यावेळी रायगड प्रीमियर लिगचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, खजिनदार कौस्तुभ जोशी, प्रदिप खलाटे, सहसचिव संदिप जोशी,सुरेंद्र भाटिकरे, महेंद्र भाटिकरे, सागर कांबळे,कुणाल पाटील, भरत सोळंकी,अँड.कौस्तुभ पुनकर उपस्थित होते.बाद फेरीची स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर मध्ये मुळ आरपीएल स्पर्धेला दिमाखात सुरुवात होणार आहे.