श्रमिक पत्रकार संघ चिपळूणच्या अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर तर कार्याध्यक्षपदी नागेश पाटील
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळुणातील पत्रकारांचं संघटन व्हावं या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. यानंतर श्रमिक पत्रकार संघ चिपळूण अशी संघटना स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर तर कार्याध्यक्षपदी नागेश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सदस्यपदी संतोष कुळे, राजेश जाधव, बाळू कांबळे, सुनिल दाभोळे, मकरंद भागवत, तर सल्लागारपदी सुभाष कदम, राजेंद्र शिंदे, समीर जाधव मकरंद भागवत यांची निवड करण्यात आली आहे.